मॅचनंतर विराट आणि गांगुली पुन्हा आले समोरासमोर, नंतर जे घडलं तुम्हीच पहा
मुंबई, 7 मे : आयपीएल 2023 मध्ये 50 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात पारपडला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने आरसीबीचा 7 विकेट्सने पराभव करून आयपीएल 2023 मधील चौथा सामना जिंकला. सामना संपल्यानंतर दोन्ही संघांचे खेळाडू हस्तांदोलन करत असताना विराट कोहली आणि दिल्ली कॅपिटल्सचा मेंटॉर सौरव गांगुली आमनेसामने आले. दिल्ली कॅपिटल्सचे होम ग्राउंड असलेल्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली विरुद्ध आरसीबी यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात आरसीबीने देखील विजयासाठी 182 धावांचे आव्हान दिले होते. तेव्हा दिल्ली कॅपिटल्सच्या फिलिप्स सॉल्टने आरसीबी विरुद्ध तब्बल 87 धावांची खेळी केली तर दिल्लीच्या इतर फलंदाजांनी ही चांगली कामगिरी करून विजयाचे आव्हान 16.4 ओव्हरमध्येच पूर्ण केले.
मॅचनंतर दोन्ही संघाचे खेळाडू हस्तांदोलन करत असताना आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि दिल्ली कॅपिटल्सचा मेंटॉर सौरव गांगुली हे दोघे समोरासमोर आले. दिल्ली विरुद्ध आरसीबी यांच्यात झालेल्या पहिल्या सामन्यात सौरव गांगुलीने विराट कोहलीशी हस्तांदोलन करणे टाळले होते, तर विराट ही मॅच दरम्यान गांगुलीला खुन्नस देताना दिसला होता. परंतु काल दोन्ही संघांमध्ये झालेल्या दुसऱ्या सामन्यात समोरासमोर येताच विराट गांगुली यांनी एकमेकांशी हात मिळवून गळाभेट घेतली. सध्या या घटनेचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी यावर विविध प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत.