JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2023 RR vs SRH : राजस्थान रॉयल्सने मारलं मैदान! सनरायजर्स हैद्राबादचा दारुण पराभव

IPL 2023 RR vs SRH : राजस्थान रॉयल्सने मारलं मैदान! सनरायजर्स हैद्राबादचा दारुण पराभव

आज आयपीएलचा चौथा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद यांच्यात पारपडला. यासामन्यात राजस्थान रॉयल्सने हैद्राबाद संघाचा दारुण पराभव केला.

जाहिरात

राजस्थान रॉयल्सने मारलं मैदान! सनरायजर्स हैद्राबादचा दारुण पराभव

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 2 एप्रिल :  जगभरातील सर्वात मोठ्या आणि प्रसिद्ध टी 20 लीगपैकी एक असणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगला सुरुवात झाली आहे. आज आयपीएलचा चौथा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद यांच्यात पारपडला. यासामन्यात राजस्थान रॉयल्सने हैद्राबाद संघाचा दारुण पराभव केला असून 72 धावांनी विजय मिळवला आहे. सनरायजर्स हैद्राबादच्या होम ग्राउंडवर हा सामना पारपडला असून यात सुरुवातीला राजस्थान रॉयल्सचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. राजस्थान संघाच्या फलंदाजीची सुरुवात दमदार झाली. जॉस बटलर आणि यशस्वी जैस्वाल हे दोघेजण सलामी फलंदाज म्हणून मैदानात उतरले आणि त्यांनी 85 धावांची भागीदारी रचली. परंतु सहाव्या षटकात जॉस बटलर  फजलहक फारुकीच्या चेंडूवर बाद झाला. त्यानंतर यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार संजू सॅमसनने संघाची बाजू सांभाळली. यशस्वी जयस्वालने 37 चेंडूत 54 धावा केल्या तर संजूने 32 चेंडूत 55 धावा केल्या. तसेच इतर खेळाडूंच्या सहकार्याने राजस्थानच्या संघाने 20 ओव्हरमध्ये 203 धावा करत 5 विकेट्स दिल्या. आयपीएल 2023 सुरुवात झाल्यापासून एखाद्या टीमने विजयासाठी दिलेले हे सर्वात मोठे आव्हान होते. IPL 2023 RCB vs MI : आरसीबीचे तीन खेळाडू विक्रमाच्या उंबरठ्यावर, मुंबईला राहवं लागणार सावध!

सनरायजर्सला हैद्राबादला विजयासाठी 204 धावांचे आव्हान मिळाले असताना मैदानात फलंदाजीसाठी आलेल्या हैद्राबादच्या संघाची सुरुवात खराब झाली.  पहिल्या ओव्हरमधल्या तिसऱ्या चेंडूवर अभिषेक शर्माची विकेट ट्रेंट बोल्टने घेतली. तर पाचव्या चेंडूवर त्याने राहुल त्रिपाठीला देखील पॅव्हेलियनमध्ये पाठवले.  सनरायजर्सला हैद्राबादकडून कोणत्याही खेळाडूला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यातल्यात्यात मयंक अग्रवालने संघासाठी 27 , हॅरी ब्रुकने 13 तर आदिल राशिदने 18 धावा केल्या. विजयाचं आव्हान पूर्ण करताना सनरायजर्स हैद्राबाद 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स देऊन केवळ 131 धावांपर्यंत मजल मारू शकली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या