JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2023: गब्बरमुळे टीममधील खेळाडू जखमी, LIVE मॅचदरम्यान मैदान सोडण्याची वेळ

IPL 2023: गब्बरमुळे टीममधील खेळाडू जखमी, LIVE मॅचदरम्यान मैदान सोडण्याची वेळ

IPL 2023 RR vs PBKS : राजस्थान विरुद्धच्या सामन्यात धवनच्या तुफान फलंदाजीने खेळाडू जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

IPL 2023 RR vs PBKS : आयपीएलचे सामने सुरू आहेत. यंदाच्या हंगामात शिखर धवनचा जलवा पाहायला मिळाला आहे. आतापर्यंतच्या झालेल्या सामन्यांमध्ये शिखर धवन सर्वाधिक धावा करणाऱ्या क्रिकेटर्समध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. नुकत्याच झालेल्या राजस्थान विरुद्धच्या सामन्यात धवनच्या तुफान फलंदाजीने खेळाडू जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. पंजाब टीमला मोठा धक्का बसला आहे, सामन्या दरम्यान पंजाब किंग्जचा फलंदाज भानुका राजपक्षे जखमी झाला. भानुकाला बॅटिंग न करताच मैदान सोडावं लागलं. आर अश्विनच्या बॉलवर गब्बरने जोरदार शॉट खेळला, पण घडलं भलतंच यामध्ये नॉन स्ट्राइकवर असलेल्या भानुकाला हा बॉल लागला.

IPL 2023 PBKS vs RR : आर अश्विनने पुन्हा केला मंकडिंगचा प्रयत्न! पंजाब किंग्सच्या कर्णधाराला दिली वॉर्निंग

पंजाब टीमकडून फिजिओ डॉक्टरांना मैदानात यावं लागलं. त्यांनी भानुकाची अवस्था पाहिली आणि मैदानातून बाहेर घेऊन गेले. त्याला किती गंभीर दुखापत झाली आहे याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आली नाही. तो पुढचा सामना खेळणार की नाही हे लवकरच पंजाब टीमकडून समजेल अशी चाहत्यांना आशा आहे. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने टॉस जिंकून प्रथम बॉलिंगचा करण्याचा निर्णय घेतला. पंजाब टीमला पहिल्यांदा बॅटिंग करावी लागली. पंजाब किंग्सने 5 धावांनी सामना जिंकला असून यासह आयपीएल 2023 च्या सलग दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला आहे.

IPL 2023 PBKS vs RR : आर अश्विन ओपनिंग बॅट्समन म्हणून उतरला मैदानात, टीमसाठी केले एवढे रन्स

शिखर धवनने 56 चेंडूंमध्ये संघासाठी 83 धावांची नाबाद खेळी. तर प्रभसिमरन सिंहने 34 चेंडूत 60 धावा करून संघाला मोठी लीड मिळवून दिली. पंजाब किंग्सने राजस्थान विरुद्ध बॅटिंग करताना 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स देऊन 197 धावा केल्या. राजस्थानकडून जेसन होल्डरने 1 विकेट तर आर अश्विन आणि युजवेंद्र चहलने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या