आयपीएल विजेत्यांना 20 कोटी तर खेळाडुंवरही बक्षीसांचा वर्षाव
अहमदाबाद, 30 मे : धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने पाचव्यांदा आयपीएलमध्ये विजेतेपद पटकावलं. अमहदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला होता. पावसामुळे लांबलेल्या या सामन्यात अखेर चेन्नई सुपर किंग्जने बाजी मारली. गुजरात टायटन्सला अखेरच्या चेंडूवर हरवून पाचव्यांदा विजेतेपदावर नाव कोरलं. यासह चेन्नईने मुंबई इंडियन्सच्या पाच विजेतेपदांशी बरोबरी केली. आयपीएल 2023 च्या फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्जला डकवर्थ लुईस नियमानुसार 15 षटकात विजयासाठी 171 धावांचे टार्गेट मिळाले होते. चेन्नई सुपर किंग्जला ट्रॉफीसह विजेते म्हणून 20 कोटी रुपयांची रक्कम मिळाली. तर उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलेल्या गुजरात टायटन्सला 12.5 कोटी रुपये मिळाले. याशिवाय तिसऱ्या क्रमांकावर राहिलेली मुंबई इंडियन्सही मालामाल झाली. त्याना 7 कोटी रुपये मिळाले. एलिमिनेटर सामन्यात पराभव पत्करलेल्या लखनऊ सुपर जायंट्सला 6.5 कोटी रुपये मिळाले. शुभमन गिलने ऑरेंज कॅप पटकावली, पण विराटचा 7 वर्षे जुना विक्रम अबाधित आयपीएलच्या पहिल्या हंगामात विजेत्या संघाला 4.8 कोटी रुपये मिळाले होते. तर उपविजेत्यांना 2.4 कोटी रुपये मिळाले होते. त्यानतंर प्राइज मनीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून प्राइज मनी वाढलेली नाही. पुढच्या हंगामात यात वाढ होण्याची शक्यता आहे. आयपीएल विजेते आणि उपविजेत्यांशिवाय पर्पल कॅप, ऑरेंज कॅफ जिंकणारे आणि इतर खेळाडूंवरही बक्षीसांचा वर्षाव झाला आहे. यात इमर्जिंग प्लेअर, सर्वाधिक षटकार, चौकार मारणाऱ्या प्लेअर्सचा समावेश आहे. कोणाला किती प्राइज? इमर्जिंग प्लेयर ऑफ द ईयर- यशस्वी जायस्वाल-10 लाख रुपये सर्वाधिक विकेट - पर्पल कॅप मोहम्मद शमी (28 विकेट) -10 लाख रुपये सर्वाधिक धावा - ऑरेंज कैप - शुभमन गिल (890 रन) - 10 लाख रुपये सर्वाधिक षटकार - फाफ डुप्लेसी (36 षटकार) 10 लाख रुपये सर्वाधिक चौकार - शुभमन गिल (85 चौकार) -10 लाख रुपये गेम चेंजर ऑफ द सीजन- शुभमन गिल- 10 लाख रुपये मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेयर- शुभमन गिल-10 लाख रुपये लॉन्गेस्ट सिक्स ऑफ द सीजन - फाफ डु प्लेसिस- 10 लाख रुपये कॅच ऑफ द सीजन- राशिद खान- 10 लाख रुपये पेटीएम फेयरप्ले अवॉर्ड - दिल्ली कैपिटल्स बेस्ट पिच एंड ग्राउंड ऑफ द सीजन - वानखेड़े स्टेडियम आणि ईडन गार्डन्स- 50 लाख रुपये सुपर स्ट्रायकर ऑफ द सीजन - ग्लेन मैक्सवेल -10 लाख रुपये आयपीएल २०२३ फायनलमध्ये पुरस्कार पटकावणारे खेळाडू इलेक्ट्रिक स्ट्राइकर ऑफ द मॅच : अजिंक्य रहाणे गेम चेंजर ऑफ द मॅच : साई सुदर्शन . मोस्ट व्हॅल्युएबल एसेट ऑफ द मॅच : साई सुदर्शन .प्लेयर ऑफ द मॅच : डेवोन कॉनवे . एक्टिव कॅच ऑफ द मॅच : एमएस धोनी . लॉन्गेस्ट सिक्स ऑफ द मॅच : साई सुदर्शन .रूपे ऑन द गो-4s ऑफ द मॅच : साई सुदर्शन