JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2023 Point Table : लखनऊने गुजरातला टाकलं मागे, तीन संघ अद्याप विजयाच्या प्रतीक्षेत

IPL 2023 Point Table : लखनऊने गुजरातला टाकलं मागे, तीन संघ अद्याप विजयाच्या प्रतीक्षेत

लखनऊ सुपर जायंट्सने सनरायजर्स हैदराबादला हरवून सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. पॉइंट टेबलमध्ये गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यापेक्षा चांगला नेट रनरेट असल्यानं लखनऊने बाजी मारली.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 08 एप्रिल : लखनऊ सुपर जायंट्सने शुक्रवारी सनरायजर्स हैदराबादला हरवून यंदाच्या आय़पीएल हंगामात दुसऱ्या विजयाची नोंद केली. यासह लखनऊ पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानी पोहोचलं आहे. त्यांचे ४ गुण झाले असून गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यापेक्षा चांगला नेट रनरेट असल्यानं लखनऊने बाजी मारली. आज आयपीएलमध्ये १ हजारावा सामना चेन्नई आणि मुंबई यांच्यात होणार आहे. सनरायजर्स हैदराबादचा हा सलग दुसऱा पराभव आहे. हैदराबादच्या संघाला अद्याप पॉइंट टेबलमध्ये खातं उघडता आलेलं नाही. ते दहाव्या स्थानी आहेत. दोन पराभवानंतर त्यांची धावगतीही कमी असल्याने ते पॉइंट टेबलमध्ये तळाला आहेत. हैदराबादशिवाय मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे असे दोन संघ आहेत ज्यांना अद्याप विजय मिळवता आलेला नाही. IPL 2023 : मुंबई-चेन्नईत हाय व्होल्टेज सामना, रोहित या Playing XI सह मैदानात उतरणार!

 केकेआर, राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांनी दोन पैकी एक सामना जिंकला आहे. यामध्ये केकेआरची धावगती चांगली असल्याने ते चौथ्या स्थानी तर राजस्थान पाचव्या आणि चेन्नई सहाव्या स्थानी आहेत. आरसीबीनेही एक सामना जिंकला तर एक गमावला आहे. ते सातव्या स्थानावर आहेत.

सनरायजर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १२१ धावा केल्या होत्या. लखनऊने हे आव्हान ४ षटकात ५ विकेट राखून पूर्ण केलं. लखनऊच्या विजयात कृणाल पांड्याने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने तीन विकेट घेतल्या. त्याशिवाय २३ चेंडूत ३४ धावांची खेळीही केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या