JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2023 : पहिल्याच आठवड्यात JioCinemaचा रेकॉर्ड, CSKvsLSG सामन्यावेळी विक्रमी प्रेक्षक

IPL 2023 : पहिल्याच आठवड्यात JioCinemaचा रेकॉर्ड, CSKvsLSG सामन्यावेळी विक्रमी प्रेक्षक

पहिल्याच आठवड्यात विकेंडला प्रेक्षकांच्या संख्येने गेल्या वर्षीच्या आयपीएल आणि आयसीसी टी२० वर्ल्ड कपच्या प्रेक्षक संख्येचा विक्रम मोडला.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 04 एप्रिल : यंदाच्या आयपीएल हंगामाचे अधिकृत डिजिटल स्ट्रिमिंग पार्टनर जिओ सिनेमा आहे. हंगामाच्या पहिल्याच आठवड्यात जिओ सिनेमावर प्रेक्षकांनी विक्रमी उपस्थिती नोंदवली. पहिल्याच आठवड्यात विकेंडला प्रेक्षकांच्या संख्येने गेल्या वर्षीच्या आयपीएल आणि आयसीसी टी२० वर्ल्ड कपच्या प्रेक्षक संख्येचा विक्रम मोडला. प्रेक्षकांचा विचार करून जिओ सिनेमाने सामन्याचे प्रक्षेपण करताना काही फीचर्स दिली आहेत. यामुळे चाहत्यांच्या सामना पाहण्याच्या वेळेतही वाढ झाली आहे. प्रत्येक प्रेक्षक सरासरी ५७ मिनिटे सामना पाहत असल्याचं नोंद झालंय. गेल्या वर्षी पहिल्या विकेंडला नोंदवलेल्या सामना पाहण्याच्या सरासरी वेळेच्या तुलनेत यावेळी ६० टक्के वाढ झाली आहे. जिओ सिनेमावर सुरवातीच्या आठवड्यातच १४७ कोटी व्ह्यूज झाले आहेत. IPL 2023 CSK vs LSG : माही मार रहा है, धोनीने गाजवलं मैदान, केला नवा रेकॉर्ड चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील लढतीवेळी जिओ सिनेमाच्या प्रेक्षकांनी रेकॉर्ड केला. तब्बल १.६ कोटी प्रेक्षक एका वेळी ऑनलाइन होते. तर चेन्नई विरुद्ध लखनऊ यांच्यातील सामन्यावेळी तब्बल १.७ कोटी लोकांनी सामना पाहिला. याशिवाय जिओ सिनेमावर २.५ कोटींहून जास्त नोंदणी झाली आणि एका दिवसात सर्वाधिक एप डाऊनलोड आणि इन्स्टॉल करण्याचा विक्रमही झाला. गेल्या हंगामातील पहिल्या आठवड्याच्या तुलनेत यावेळी जिओ सिनेमावर सामना पाहण्यासाठी घालवलेला वेळ हा ६० टक्क्यांनी वाढला आहे. जिओ सिनेमावर १४७ कोटींहून अधिक व्ह्यूज झाले. जे आय़पीएलच्या इतिहासात आतापर्यंत विकेंडला सर्वाधिक आहेत.

यंदाच्या हंगामात जिओ सिनेमाने १२ भाषांमध्ये कमेंट्री सुरू केलीय. यामध्ये इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराती, भोजपुरी, पंजाबी, ओरिया, बंगाली, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांचा समावेश आहे. याशिवाय JioCinemaने चार अतिरिक्त फीड दिली आहेत. ज्यात इनसाइडर्स फीड, Hangout फीड, फॅन्टसी फीड आणि फॅनझोन फीड यांचा समावेश आहे. चाहत्यांना या हंगामात सामने पाहताना खास अनुभव मिळणार आहे. 4K फीड, 12-भाषांमध्ये कव्हरेज, 16 युनिक फीड्स, हाइप मोड आणि मल्टीकॅम सेटअप यांसारख्या फीचर्सचा यावेळी समावेश करण्यात आलाय. देशात पसरलेल्या डिजिटल क्रांतीचा हा पुरावा असून इतक्या मोठ्या संख्येने डिजिटली सामना पाहण्याची आकडेवारी ही अपवादात्मक अशीच आहे. TATA IPL 2023 च्या ओपनिंग वीकेंडमध्ये प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. प्रेक्षकांनी जिओ सिनेमावर नोंदवलेली उपस्थिती ही यावर सामने पाहणं अधिक सुलभ, परवडणारे असल्याचं तसंच भोजपुरी, पंजाबी, ओरिया यासह अनोख्या क्रिकेट ब्रॉडकास्ट भाषांमध्ये कमेंट्रीमुळे JioCinema वर दाखवलेला विश्वासच आहे. आमच्या सर्व प्रायोजकांचे, जाहिरातदारांचे आणि भागीदारांचे आभार मानतो असं Viacom18 Sports चे सीईओ अनिल जयराज यांनी म्हटलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या