JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2023 LSG vs PBKS : लखनऊने मैदान गाजवलं, रचला धावांचा डोंगर; IPL 2023 मधला नवा रेकॉर्ड

IPL 2023 LSG vs PBKS : लखनऊने मैदान गाजवलं, रचला धावांचा डोंगर; IPL 2023 मधला नवा रेकॉर्ड

शुक्रवारी लखनऊ सुपर जाएंट्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात झालेल्या सामन्यात लखनऊने प्रथम फलंदाजी करताना पंजाबच्या होम ग्राउंडवरधावांचा डोंगर रचला आहे.

जाहिरात

लखनऊने मैदान गाजवलं, रचला धावांचा डोंगर; IPL 2023 मधला नवा रेकॉर्ड

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 28 एप्रिल : आयपीएल ही जगप्रसिद्ध टी 20 क्रिकेट लीग स्पर्धा आता रंगात येऊ लागली असून या स्पर्धेत दररोज नवनवीन विक्रम रचले जात आहेत. शुक्रवारी लखनऊ सुपर जाएंट्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात झालेल्या सामन्यात लखनऊने प्रथम फलंदाजी करताना पंजाबच्या होम ग्राउंडवरधावांचा डोंगर रचला आहे. आयपीएल 2023 मधील 38 वा सामना पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर लखनऊ सुपर जाएंट्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात सुरुवातीला टॉस जिंकून पंजाब किंग्सच्या कर्णधाराने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी मैदानात फलंदाजीसाठी उतरलेल्या लखनऊच्या संघाने तुफान फटकेबाजी करत पंजाबला गुडघ्यावर आणले. लखनऊने पंजाब विरुद्ध फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये तब्बल 257 धावा केल्या. जो आयपीएल 2023 मधील सर्वात मोठा स्कोर ठरला. तसेच 257 धावा करताना लखनऊ सुपर जाएंट्सने केवळ 5 विकेट्स गमावल्या.  एवढी मोठी धावसंख्या करणारा लखनऊचा संघ हा आयपीएलच्या इतिहासातील दुसरा संघ ठरला. यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने 2013 साली पुणे वॉरियर्स विरुद्ध 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 263 धावांची कामगिरी केली होती. आरसीबीचा हा रेकॉर्ड तोडण्यापासून लखनऊ सुपर जाएंट्सचा संघ अवघ्या 6 धावा मागे राहिला.

धावांचा डोंगर उभारण्यासाठी लखनऊ सुपर जाएंट्सच्या संघाकडून कर्णधार केएल राहुलने 12, काइल मेयर्सने 54, आयुष बडोनीने43, मार्कस स्टॉइनिसने 72, निकोलस पुरनने 45, कृणाल पांड्याने 5 तर दीपक हुडाने  11 धावा केल्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या