JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2023 : मोहालीमध्ये लखनऊचं वादळ, होम ग्राऊंडवरच पंजाबला पराभवाचा धक्का

IPL 2023 : मोहालीमध्ये लखनऊचं वादळ, होम ग्राऊंडवरच पंजाबला पराभवाचा धक्का

आयपीएल 2023 मधील 38 वा सामना लखनऊ सुपर जाएंट्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात लखनऊने पंजाब किंग्सचा दारुण पराभव केला आहे.

जाहिरात

मोहालीमध्ये लखनऊचं वादळ, होम ग्राऊंडवरच पंजाबला पराभवाचा धक्का

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 28 एप्रिल : आयपीएल 2023 मधील 38 वा सामना लखनऊ सुपर जाएंट्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात लखनऊने पंजाब किंग्सचा दारुण पराभव केला आहे. लखनऊ सुपर जाएंट्सने पंजाब किंग्सवर 56 धावांनी विजय मिळवला असून त्यांना पंजाब किंग्सचा विजयी रथ रोखण्यात यश आले आहे. मोहाली येथील पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर लखनऊ सुपर जाएंट्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात सामना पारपडला. या सामन्यात सुरुवातीला टॉस जिंकून पंजाब किंग्सच्या कर्णधाराने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी मैदानात फलंदाजीसाठी उतरलेल्या लखनऊच्या संघाने तुफान फटकेबाजी करत पंजाबला गुडघ्यावर आणले. लखनऊ सुपर जाएंट्सच्या संघाकडून कर्णधार केएल राहुल ने 12, काइल मेयर्सने 54, आयुष बडोनीने43, मार्कस स्टॉइनिसने 72, निकोलस पुरनने 45, कृणाल पांड्याने 5 तर दीपक हुडाने  11 धावा केल्या. लखनऊने फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये तब्बल 257 धावा केल्या, जो आयपीएल 2023 मधील सर्वात मोठा स्कोर ठरला.

विजयासाठी २५८ धावांचे आव्हान मिळाले असताना कर्णधार शिखर धवन केवळ 1 धाव करून बाद झाला. विजयासाठी 258 धावांचे आव्हान मिळाले असताना कर्णधार शिखर धवन केवळ १ धाव करून बाद झाला. परंतु उर्वरित पंजाबच्या संघाने लखनऊला चांगली टक्कर दिली. पंजाब किंग्सकडून अथर्व तायडेने 66, सिकंदर रझाने 36, लिविनस्टोनने 23, सॅम करनने  21, जितेश शर्माने 24 धावा केल्या. तर इतर फलंदाजांना दोन अंकी धावसंख्या करता आली नाही. अखेर लखनऊ सुपर जाएंट्स संघाचा 56 धावांनी विजय झाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या