JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2023 : एकेकाळी फरशी साफ करायचा, आज IPL मध्ये आहे स्टार खेळाडू, जाणून घ्या रिंकू सिंहची संघर्षमय कहाणी

IPL 2023 : एकेकाळी फरशी साफ करायचा, आज IPL मध्ये आहे स्टार खेळाडू, जाणून घ्या रिंकू सिंहची संघर्षमय कहाणी

आयपीएल ही स्पर्धा खेळाडूंचं आयुष्य बदलून टाकते. आयपीएलमध्ये जबरदस्त परफॉर्म केलेल्या खेळाडूंना प्रसिद्धी सह अफाट पैसा देखील मिळतो. यामुळे केवळ खेळाडूंचंच नाही तर त्यांच्या कुटुंबाचं देखील आयुष्य बदलत. अशाच एका स्टार खेळाडू विषयी आपण जाणून घेणार आहोत.

जाहिरात

एकेकाळी फरशी साफ करायचा, आज IPL मध्ये आहे स्टार खेळाडू, घराचं कर्जही फेडलं!

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अलिगढ, 30 मार्च : आयपीएलचा 16 वा सीजन 31 मार्च पासून सुरु होणार आहे. अहमदाबाद येथे आयपीएलचा पहिला सामना चेन्नई विरुद्ध गुजरात यांच्यात होणार असून क्रिकेटचे चाहते यासाठी फार उत्सुक आहेत. आयपीएलबाबत असं म्हटलं जातं, की ही स्पर्धा खेळाडूंचं आयुष्य बदलून टाकते. आयपीएलमध्ये जबरदस्त परफॉर्म केलेल्या खेळाडूंना प्रसिद्धी सह अफाट पैसा देखील मिळतो. यामुळे केवळ खेळाडूंचंच नाही तर त्यांच्या कुटुंबाचं देखील आयुष्य बदलत. अशाच एका स्टार खेळाडू विषयी आपण जाणून घेणार आहोत. कोलकाता नाईट रायडर्सचा स्टार क्रिकेटर रिंकू सिंह याने आतापर्यंत आयपीएलच्या कारकिर्दीत एकूण 17 सामने खेळले असून यात 251 धावा केल्या आहेत. सिलिंडर डिलिव्हरी मॅनच्या पाच मुलांपैकी एक असलेल्या रिंकूने शालेय जीवनापासूनच क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती. रिंकू तरुण वयात झाडू काढणे आणि लादी पुसण्यासारखी काम देखील करायचा. परंतु घरातील गरिबीमुळे त्याचे वडील नेहमी त्याच्या क्रिकेट खेळण्याच्या विरोधात होते. अनेकदा क्रिकेटवरून घरी येणाऱ्या रिंकूला मारण्यासाठी त्याचे वडील काठी घेऊनच तयारच असायचे. पाहायचे. मात्र याकाळात भावांनी रिंकूला साथ दिली. IPL 2023 : गोविंदाच्या जावयाचा आयपीएलमध्ये जलवा, KKR ला जिंकवून देणार IPL ची ट्रॉफी? रिंकूची वहिनी आरतीने न्यूज18शी केलेल्या संवादात सांगितले की, कुटुंबाला रिंकूचे क्रिकेट खेळणे आवडत नव्हते, पण 2012 मध्ये जेव्हा रिंकूने एका शालेय स्पर्धेत बाईक जिंकली तेव्हा कुटुंबाचे मत बदलू लागले. सुरुवातीला रिंकूने क्रिकेटमधून कमावलेले पैसे कुटुंबाचे कर्ज फेडण्यासाठी गेले. आयपीएल मध्ये पोहोचणारा अलिगढचा पहिला खेळाडू रिंकू सिंह याला आयपीएलच्या टूर्नामेंटमध्ये इतके पैसे मिळाले जे त्याच्या सात पिढ्यांमध्ये कोणीही पहिले नव्हते. रिंकूला आयपीएलमधून मिळालेल्या पैशामुळे त्याच्या घरच्या अडचणी दूर झाल्या. त्यांनी जमीन घेऊन घर बांधले आणि सर्व कर्ज देखील फेडले.

रिंकूने 2017 रोजी आयपीएलमध्ये पदार्पण केले.  2017 मध्ये रिंकूला पहिल्यांदा पंजाब किंग्सने खरेदी केले होते. तेव्हा त्याला 10 लाख या बेस प्राईजवर खरेदी करण्यात आले होते.  त्यानंतर रिंकू सिंगला शाहरुख खानच्या कोलकाता नाइट रायडर्सने 2018 रोजी त्याला 80 लाख रुपयांना खरेदी केले. आयपीएल सोबतच रिंकू देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्तर प्रदेशाकडून खेळत असताना देखील चांगले प्रदर्शन करीत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या