JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2023 DC vs GT : नो बॉलवर उडाला गोंधळ, दिल्लीच्या कॅप्टनने स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड, मैदानात नेमकं काय घडलं?

IPL 2023 DC vs GT : नो बॉलवर उडाला गोंधळ, दिल्लीच्या कॅप्टनने स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड, मैदानात नेमकं काय घडलं?

गुजरातचा अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमी दिल्लीला धक्के देत असताना नो बॉलवर विकेट घालवून डेविड वॉर्नरने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली. सध्या सोशल मीडियावर वॉर्नरच्या विकेटचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

जाहिरात

नो बॉलवर उडाला गोंधळ, दिल्लीच्या कॅप्टनने स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड, मैदानात नेमकं काय घडलं?

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 2 मे : आयपीएल 2023 मध्ये 44 वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात पारपडला. या सामन्यात गुजरातचा अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमी दिल्लीला धक्क्यांवर धक्के देत असताना नो बॉलवर विकेट घालवून दिल्लीचा कर्णधार डेविड वॉर्नरने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली. सध्या सोशल मीडियावर वॉर्नरच्या विकेटचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. यात सुरुवातीला दिल्लीचा कर्णधार डेविड वॉर्नर याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. गुजरात विरुद्ध प्रथम फलंदाजी करून त्यांच्या समोर विजयासाठी मोठ्या धावसंख्येचे आव्हान ठेवण्याचा प्लॅन दिल्लीचा होता. परंतु त्यांच्या हा प्लॅन गुजरातच्या गोलंदाजांनी फ्लॉप ठरवला. मोहम्मद शमीने पहिल्याच ओव्हरमध्ये दिल्लीच्या फिलिप्स सॉल्टची विकेट घेतली. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये हार्दिक पांड्याने नो बॉलवर गोंधळ उडाल्याने कर्णधार डेविड वॉर्नरची विकेट गेली.

दुसऱ्या ओव्हरमध्ये संघाची धावसंख्या 6 वर असताना प्रियम गर्ग हा स्ट्राईकवर होता. यावेळी हार्दिक पांड्याने टाकलेल्या बॉलवर शॉट मारण्याचा प्रियम गर्गचा प्रयत्न होता, परंतु त्याने मारलेला चेंडू राशीद खानने हातात पकडला. प्रियामने धाव घेण्यासाठी वॉर्नरला इशारा दिला परंतु नंतर नकार देऊन त्याला पुन्हा मागे वळण्यास सांगितले. यावेळी मोठा गोंधळ झाला कारण वॉर्नरने तेवढ्यात धाव घेण्यासाठी क्रिज सोडली होती. त्याच वेळी राशीदीने पळत येत वॉर्नरला रन आऊट केले आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा दिल्लीने एक विकेट गमावली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या