IPL 2023 ची ट्रॉफी कोण जिंकणार? पाकिस्तानच्या माजी खेळाडूने केली भविष्यवाणी
नवी दिल्ली, 29 मे : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएल 2023 चा अंतिम सामना सुरु आहे. रविवारी 28 मे रोजी नियोजित करण्यात आलेला आयपीएलचा अंतिम सामना पावसामुळे सोमवारी खेळवण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला होता. यंदा आयपीएलच्या 16 व्या सीजनचे विजेतेपद कोण पटकावणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. अशातच पाकिस्तानच्या एका माजी खेळाडूने यंदा आयपीएलचे ट्रॉफी कोण जिंकणार याविषयीची भविष्यवाणी केली आहे. स्पोर्ट्सकीडाशी बोलताना पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम म्हणाला, चेन्नई आणि गुजरात संघ अव्वल चारमध्ये स्थान मिळवतील अशी मला आधीच अपेक्षा होती. गुजरातचा संघ शुभमन गिल आणि कर्णधार हार्दिक पंड्यावर अधिक अवलंबून आहे.
तो पुढे म्हणाला, चेन्नई संघाविषयी बोलताना वसीम अक्रम म्हणाला की, चेन्नई 10 व्यांदा फायनलमध्ये पोहोचली आहे. पुनरागमन कसे करायचे हे या संघाला चांगलेच ठाऊक आहे. जरी त्यांनी लवकर विकेट गमावल्या असतील. पण शांत राहण्याचा मार्ग या संघाला चांगलाच ठाऊक आहे. इतर लोकांचे मत वेगळे असू शकते परंतु माझ्यासाठी 60 टक्के चेन्नई आणि 40 टक्के अंतिम सामना गुजरात संघाच्या बाजूने जाण्याची अपेक्षा आहे.