पराभवानंतर विराटने धोनीसाठी केलेल्या पोस्टने जिंकलं भारतीयांचं मन
मुंबई, 18 एप्रिल : आयपीएल 2023 स्पर्धेचा रोमांच दिवसागणिक वाढू लागला आहे. दररोज एकापेक्षाएक सामने प्रेक्षकांना पाहायला मिळत असून क्रिकेटर्समधील अनेक सुंदर प्रसंगांचे देखील चाहते साक्षीदार होत असतात. असाच एक सामना चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यामध्ये देखील पारपडला. या सामन्यात आरसीबीचा पराभव झाला परंतु विराट कोहलीने केलेल्या एका कृतीने सर्वांचं मन जिंकलं. सोमवारी चिन्नस्वामी स्टेडियमवर यंदाच्या आयपीएल मधील 24 वा सामना चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यात पारपडला. या सामन्यात चेन्नईने आरसीबीवर 8 धावांनी विजय मिळवला. या सामन्यानंतर मैदानात विराट कोहलीने एम एस धोनीची गळाभेट घेतली आणि बराच वेळ या दोघांमध्ये संवाद झाला. यानंतर विराटने धोनी सोबतच एक फोटो त्याच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर ट्विट केला.
विराट कोहलीने धोनी सोबत गळाभेट घेत असतानाचा फोटो ट्विट करत त्या फोटोला “❤️+💛= 🇮🇳 " असे कॅप्शन दिले.
पराभव झाल्यानंतर विराटने ट्विट केलेल्या या फोटोने चाहत्यांचे मन जिंकले. त्याचे हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावर नेटकरी लाईक्सचा वर्षाव करीत आहेत.