JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2023 CSK vs KKR : रिंकू-राणामुळे KKR अजूनही प्ले-ऑफच्या रेसमध्ये, घरच्या मैदानात CSK ला धक्का

IPL 2023 CSK vs KKR : रिंकू-राणामुळे KKR अजूनही प्ले-ऑफच्या रेसमध्ये, घरच्या मैदानात CSK ला धक्का

आयपीएल 2023 मधील 61 वा सामना चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात पारपडला. या सामन्यात केकेआरने चेन्नईचा पराभव केला आहे.

जाहिरात

रिंकू-राणामुळे KKR अजूनही प्ले-ऑफच्या रेसमध्ये, घरच्या मैदानात CSK ला धक्का

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 मे : आयपीएल 2023 मधील 61 वा सामना चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात पारपडला. या सामन्यात केकेआरने चेन्नईचा पराभव केला आहे. चेन्नई सुपरकिंग्सच्या होम ग्राउंडवर झालेल्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने 6 विकेट्सने सामना जिंकला. या विजयासह केकेआर अजूनही प्लेऑफच्या रेसमध्ये कायम आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात चेन्नईचा कर्णधार एम एस धोनीने प्रथम टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नई सुपरकिंग्सचा संघ मैदानात आला परंतु केकेआरच्या भेदक गोलंदाजी समोर त्यांचा डाव गडगडला. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडने 17, कॉनवेने 30, अजिंक्य रहाणेने 16, शिवम दुबेने 48, रवींद्र जडेजाने 20 तर एम एस धोनीने 2 धावा केल्या. केकेआरच्या गोलंदाजांना चेन्नईच्या तब्बल ६ विकेट्स घेण्यात यश आले.

चेन्नई सुपरकिंग्सने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 144 धावा केल्या, तर केकेआरला 145 धावांचे आव्हान दिले. विजयाचे आव्हान पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरलेल्या केकेआरच्या फलंदाजीची सुरुवात खराब झाली. परंतु केकेआरचा कर्णधार नितीश राणा आणि रिंकू सिंहच्या अर्धशतकीय खेळीने केकेआरचा डाव सावरला. केकेआरकडून नितीश राणाने 57, रिंकू सिंहने 54 धावा केल्या तर जेसन रॉयने 12 धावा केल्या.  अखेर नितीश आणि रिंकूच्या धडाकेबाज खेळीमुळे केकेआरने विजयाचे आव्हान 18.3 ओव्हरमध्येच पूर्ण केले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या