JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2023 : आशिष नेहराच्या मुलाने केली वडिलांची नक्कल, गुजरात टायटन्सने शेअर केला Video

IPL 2023 : आशिष नेहराच्या मुलाने केली वडिलांची नक्कल, गुजरात टायटन्सने शेअर केला Video

गुजरात टायटन्स संघाचा हेड कोच आशिष नेहरा याच्या मुलाने आशिषची मिमिक्री केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जाहिरात

आशिष नेहराच्या मुलाने केली वडिलांची नक्कल, गुजरात टायटन्सने शेअर केला Video

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 3 मे : आयपीएल 2023 मध्ये झालेल्या 44 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने गुजरात टायटन्सचा त्यांच्याच होम ग्राउंडवर पराभव केला आहे. परंतु दिल्लीने जरी गुजरातचा पराभव केला असला तरी अद्याप आयपीएल पॉईंट टेबलमध्ये गुजरातकाचा संघ 9 पैकी 6 सामने जिंकून अव्वल स्थानी कायम आहे.  याच श्रेय खेळाडूं प्रमाणेच संघाचे हेड कोच आशिष नेहराला सुद्धा जात. गुजरातचे हेड कोच आणि भारताचे माजी क्रिकेट आशिष नेहरा यांचा 44 वा वाढदिवस 29 एप्रिल रोजी साजरा करण्यात आला. यानिमीत्ताने गुजरात टायटन्सने आशिष नेहराचा मुलगा आरुष याचा एक मजेदार व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात मुलगा आरुष बाउंड्री लाईनवर उभा राहून वडील आशिष नेहरा यांची मिमिक्री करताना दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावर चाहते लाईक्स आणि मजेदार कमेंट्सचा वर्षाव करीत आहेत.

संबंधित बातम्या

व्हिडीओमध्ये आरुष नेहरा वडिल आशिष नेहरा मॅचच्या दिवशी बाउंड्री लाईनवर उभे राहून कसे वागतात याची नक्कल करत होता. त्याने आशिष प्रमाणेच हात मागे ठेऊन बॉलरला फास्ट आणि लेंथ बॉल टाकण्याच्या सूचना दिल्या. आरुषने वडिलांच्या केलेल्या नक्कलीचा व्हिडिओ चाहत्यांना आवडल्याचे पाहायला मिळत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या