दुबई, 19 सप्टेंबर : आयपीएल 2021 च्या (IPL 2021) दुसऱ्या राऊंडला आजपासून सुरुवात होत आहे. पहिलाच सामना गतविजेती मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स (MI vs CSK) यांच्यात होणार आहे. या दोन्ही टीम कागदावर मजबूत वाटत असल्या तरी मुंबईच्या टीमची कामगिरी फारशी समाधानकारक झाली नाही. मुंबईला या मोसमात फक्त 43 सिक्सच मारता आल्या आहेत, दुसरीकडे चेन्नईची टीम 62 सिक्ससह पहिल्या क्रमांकावर आहे. पॉईंट्स टेबलमध्ये मुंबईची टीम चौथ्या आणि चेन्नईची दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबईचं नेतृत्व रोहित शर्मा (Rohit Sharma) करत आहे, तर चेन्नईचा कॅप्टन एमएस धोनी (MS Dhoni) आहे. आयपीएलचा मागचा मोसमही युएईमध्येच झाला होता. त्यावेळी मुंबई इंडियन्सने ट्रॉफी जिंकली होती. मागच्या मोसमात मुंबईने सर्वाधिक 137 सिक्स मारले होते. आता पुन्हा एकदा अशीच कामगिरी करण्यासाठी मुंबईची टीम मैदानात उतरेल. राजस्थान रॉयल्सची टीम 105 सिक्ससह मागच्या वर्षी दुसऱ्या क्रमांकावर होती. चेन्नईने मागच्या मोसमात निराशाजनक कामगिरी केली. आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच त्यांना प्ले-ऑफमध्ये प्रवेश मिळाला नव्हता. पॉईंट्स टेबलमध्येही चेन्नई सातव्या क्रमांकावर होती. IPL 2021: मुंबईच्या मॅचपूर्वी धोनीनं दाखवलं ट्रेलर, VIDEO पाहून वाढलं रोहितचं टेन्शन हार्दिक-इशान फेल मागच्या मोसमात इशान किशन (Ishan Kishan) आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांनी मुंबईसाठी धमाकेदार कामगिरी केली होती. यावर्षी मात्र दोघांची कामगिरी खराब झाली आहे. पांड्याने 7 मॅचच्या 6 इनिंगमध्ये 9 च्या सरासरीने फक्त 52 रन केल्या, ज्यात दोन सिक्सचा समावेश आहे. तर इशान किशनने 5 इनिंगमध्ये 15 च्या सरासरीने 73 रन केले आणि 2 सिक्स मारल्या. IPL 2021: मुंबई आणि चेन्नईची होणार परीक्षा, दोन्ही टीमसमोर असेल ‘हे’ आव्हान बुमराहला विकेट नाही दुसरीकडे मुंबईचं सगळ्यात घातक अस्त्र असणाऱ्या जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) पॉवरप्लेमध्ये एकही विकेट घेता आली नाही. यादरम्यान त्याने 60 बॉलमध्ये 54 रन दिल्या. बुमराहला 7 मॅचमध्ये 6 विकेट मिळाल्या. याशिवाय लेग स्पिनर राहुल चहरला (Rahul Chahar) 11 आणि फास्ट बॉलर ट्रेन्ट बोल्ट (Trent Boult) याला 8 विकेट मिळाल्या आहेत.