दरम्यान, आयपीएलच्या 13व्या हंगामाला आता सुरुवात होणार असून विराट 12 वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज आहे. विराटनं ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. यात तो RCBच्या खेळाडूंसोबत मस्ती करताना दिसत आहे.
नवी दिल्ली, 08 सप्टेंबर : आयपीएलच्या (IPL 2020) तेराव्या हंगामाला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. गेल्या 12 वर्षात एकदाही आयपीएल न जिंकलेला विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ यंदा दुष्काळ संपवण्यास सज्ज आहे. याआधी विराटनं संघाची तयारी कशी सुरू आहे, याबाबत सांगितले. तेराव्या हंगामात विराट आणि त्याचा संघ कोणत्याही दबावाशिवाय खेळणार आहे. कोहलीच्या मते, “2016मध्ये अशीच शांतता मी अनुभवली होती, त्यामुळे या हंगामात नक्की संघ चांगली कामगिरी करेल”. RCBच्या संघात विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स सारखे चॅम्पियन खेळाडू असूनही संघाला गेल्या तीन सत्रात संघाला प्ले ऑफपर्यंतही मजल मारता आली नाही. याआधी 2016मध्ये RCBचा संघ फायनलपर्यंत पोहचला होता. या हंगामात कोहलीनं 4 शतक लगावले होते. वाचा- कोरोनाला घाबरले दिग्गज खेळाडू? आतापर्यंत ‘या’ 5 खेळाडूंनी घेतली IPLमधून माघार संतुलित आहे RCBचा संघ: विराट भारतीय कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) RCBचा युट्यूब शो ‘बोल्ड डायरीज’मध्ये सांगितले की, 2016 आयपीएलचा भाग होणे, हा एक सुखद अनुभव होता. त्यानंतर हा संघ सर्वात संतुलित संघ आहे. कोहलीने असेही सांगितले की, त्याला आणि एबी या हंगामात 2016 सारखा चमत्कार घडू शकतो असे वाटते. तसेच, याआधी कधीच अशी शांतता मी अनुभवली नव्हती. सर्व संघ फिट आहे. तसेच, “संघात अनेक प्रतिभावान खेळाडू आहेत. अपेक्षाशिवाय संघ खेळेल त्यामुळे नक्कीच खेळाडू निश्चिंत असतील. माइक हेसन मुख्य कोच म्हणून संघासोबत असणे खूप फायदेशीर आहे”, असेही विराट म्हणाला. वाचा- रोहित शर्मा नाही तर ‘हा’ खेळाडू IPL मध्ये मारू शकतो डबल सेंच्यूरी फिंच, मॉरिसने वाढवला विराटचा आत्मविश्वास गेल्या तीन वर्षात RCBचा संघ गुणतालिकेत तळाशी होता. अशा परिस्थिती या हंगामात विराट कोहलीनं आपला प्लॅन बदलला आहे. विराट म्हणाला की, खेळाडू सध्या निश्चिंत आहेत. त्यांना काहीही चिंत असेल तर ते येऊन बोलतात. त्यांना बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. तसेच, कोहली म्हणाला की, दक्षिण आफ्रिकेचा जलद गोलंदाज ख्रिस मॉरिस, ऑस्ट्रेलियााचा एकदिवसीय कर्णधार अॅरॉन फिंच आणि विकेटकीपर फलंदाज जोश फिलीप संघात आल्यामुळे संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. यावर्षी आयपीएलचे सामना दुबई, अबु धाबी आणि शारजाहमध्ये खेळले जातील. 21 सप्टेंबर रोजी पहिला RCBचा संघ सनरायझर्सविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे.