आयपीएलमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सच्या संघाला तीनवेळा विजेतेपद जिंकता आले आहे. मात्र, आतापर्यंत त्यांना एकदाही आपला पहिला सामना जिंकता आलेला नाही.
मुंबई, 16 जानेवारी : आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळं या हंगामाची उत्सुकता चाहत्यांमध्ये वाढली आहे. मुख्य म्हणजे आयपीएलच्या तेराव्या हंगामाचा शुभारंभ गेल्या हंगामातील फायनल गाजवणारे मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज करणार आहेत. मुंबई आणि चेन्नई यांच्यात या हंगामातील पहिला हायवोल्टेज सामना 29 मार्च रोजी मुंबईत रात्री 8 वाजता होणार आहे. मुख्य म्हणजे गेल्या हंगामात मुंबई आणि चेन्नई यांच्यात अंतिम सामना झाला होता. यावेळी चेन्नईच्या तोंडचा घास पळवत मुंबईने सामना जिंकला होता. त्यामुळं तेराव्या हंगामात चेन्नईचा संघ बदला घेण्यासाठी तर गतविजेता मुंबईचा संघ होमग्राउंडवर विजयी सुरुवात करण्यासाठी सज्ज असतील. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत आयपीएलमध्ये सर्वात जास्त म्हणजे 4 वेळा विजेतेपद जिंकले आहे. त्यामुळं पाचव्या विजेतेपदासाठी मुंबई पलटन सज्ज आहे. आयपीएलचे तेरावे हंगाम 50 दिवसाचे असून 17 मे पर्यंत सामने खेळले जाणार आहेत. सध्या लीग स्टेजमधील सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानंतर नॉक आउट राउंडचे सामना होतील. वाचा- IPLच्या तेराव्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर! जाणून घ्या कोणात होणार पहिला सामना?
वाचा- थाला इज बॅक! 8 महिन्यांनंतर ‘या’ संघाविरुद्ध धोनी खेळणार पहिला सामना असे आहेत मुंबईचे सामने 29 मार्च- चेन्नई सुपर किंग्ज vs मुंबई इंडियन्स 1 एप्रिल- सनरायझर्स हैदराबाद vs मुंबई इंडियन्स 5 एप्रिल- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू vs मुंबई इंडियन्स 8 एप्रिल- किंग्ज इलेव्हन पंजाब vs मुंबई इंडियन्स 12 एप्रिल- कोलकाता नाईट रायडर्स vs मुंबई इंडियन्स 15 एप्रिल- राजस्थान रॉयल्स vs मुंबई इंडियन्स 20 एप्रिल- किंग्ज इलेव्हन पंजाब vs मुंबई इंडियन्स 24 एप्रिल - चेन्नई सुपर किंग्ज vs मुंबई इंडियन्स 28 एप्रिल- कोलकाता नाईट रायडर्स vs मुंबई इंडियन्स 1 मे – दिल्ली कॅपिटल्स vs मुंबई इंडियन्स 6 मे- दिल्ली कॅपिटल्स vs मुंबई इंडियन्स 9 मे- सनरायजर्स हैदराबाद vs मुंबई इंडियन्स 11 मे - राजस्थान रॉयल्स vs मुंबई इंडियन्स 17 मे- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू vs मुंबई इंडियन्स वाचा- IPLआधी मुंबई इंडियन्सला सर्वात मोठा झटका, दिग्गज प्रशिक्षकाने सोडली साथ 50 दिवस चालणार आयपीएल क्रिकबजनं दिलेल्या माहितीनुसार, या हंगामातील सामना 29 मार्च ते 17 मे दरम्यान खेळले जातील. आयपीएलचा 12वा हंगाम 44 दिवस चालला होता, तर तेरावा हंगाम 50 दिवस चालणार आहे. या हंगामाचा लीग स्टेजमधील शेवटचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. दरम्यान नॉकआऊट स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही. राजस्थान रॉयल्स वगळता इतर सर्व संघाचे सामने त्यांच्या घरच्या मैदानावर होतील. तर राजस्थान संघाचे सामने गुवाहटी येथे होणार आहेत.