JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2020 : धोनीच्या CSK ला पुन्हा एक धक्का; मॅचविनर खेळाडू संघातून बाहेर

IPL 2020 : धोनीच्या CSK ला पुन्हा एक धक्का; मॅचविनर खेळाडू संघातून बाहेर

IPL 2020 मध्ये शुक्रवारी दिल्ली कॅपिटल्सविरोधात(DC) होणाऱ्या सामन्यात चेन्नईचा (CSK) भरवशाचा फलंदाज संघाबाहेर असेल.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 24 सप्टेंबर : IPL 2020 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपरकिंग्ज संघाला (CSK) मोठा फटका बसला आहे. शुक्रवारी दिल्ली कॅपिटल्सविरोधात(DC) होणाऱ्या सामन्यात चेन्नईचा भरवशाचा फलंदाज अंबाती रायडू (Ambati raidu) खेळू शकणार नाही. दुखापतीमुळे रायडू या आणखी एका सामन्यातून बाहेर पडला आहे. CSK च्या व्यवस्थापनाकडून ही माहिती देण्यात आली आहे. अगोदरच चेन्नईच्या संघाला या IPL हंगामाच्या सुरुवातीपासून एका मागोमाग एक धक्के बसत आहेत. सुरुवातीलाच चेन्नईच्या संघाला Coronavirus चा फटका बसला. एका खेळाडूला संसर्ग झाला. त्यानंतर दोन खेळाडू IPL खेळणार नसल्याचं जाहीर झालं. तरीही पहिला सामना CSK ने रायडूच्या शानदार खेळीने जिंकला होता. आता पुढच्या सामन्यात अंबाती रायडूच नसल्यामुळे चेन्नईला धक्का बसला आहे. IPL 2020 च्या चेन्नईच्या पहिल्याच सामन्यात अंबाती रायडूने 3 षटकार आणि 6 चौकार मारून 48 चेंडूत 71 धावांची बरसात केली होती. त्याच्या या दमदार खेळीने चेन्नईचा विजय सुकर झाला होता. त्यानंतर राजस्थान रॉयल्सबरोबरचा सामना दुखापतीमुळे रायडू खेळू शकला नव्हता. हा सामना चेन्नई सुपकिंग्ज 16 धावांनी हरले. आता पुढचा सामनाही धोनीच्या संघाला रायडूविना खेळावा लागणार आहे. CSR च्या व्यवस्थापनाच्या वतीने वृत्तसंस्थेला रायडूच्या अनुपस्थितीविषयी माहिती देण्यात आली. अंबाती रायडूला हॅमस्ट्रिंग इंज्युरी झाली आहे. या दुखापतीतून तो अजून पूर्णपणे बाहेर न आल्याने आणखी एका सामन्याला त्याला मुकावं लागणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या