मुंबई, 21 डिसेंबर : आयपीएल 2020च्या लिलावात ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंची चांदी झाली. त्याचबरोबर लिलावात चर्चेचे विषय ठरले ते युवा खेळाडू. विराट सिंह, यशस्वी जयस्वाल, मोहसीन खान, प्रियम गर्ग यांच्यावर सर्वात जास्त बोली लागली. मात्र यात एक नाव सगळ्यात गाजलं ते म्हणजे दिग्विजय देशमुख. दिग्विजय देशमुखला मुंबई इंडियन्स संघानं लिलावाच्या अखेरच्या फेरीत 20 लाख रुपयांच्या बेस प्राईजवर विकत घेतले. मात्र दिग्विजयबाबतची एक गोष्ट फार कमी लोकांना माहित असेल ती म्हणजे क्रिकेटमध्ये करिअर करण्यापूर्वी त्यांनी चित्रपटांमध्ये भूमिका केली होती. सुशांत सिंग राजपूतची प्रमुख भूमिका असलेल्या ‘काय पो चे’ या सिनेमात दिग्विजय अली हाशमीच्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटात दिग्विजय एक प्रतिभावान तरूण क्रिकेटपटूची भूमिका साकारली होती. वाचा- IPL Auctionमध्ये ‘या’ मिस्ट्री गर्लनं लावली कोट्यावधींची बोली, नेटकरीही फिदा ऑलराऊंडर खेळाडू आहे दिग्विजय देशमुख 21 वर्षीय दिग्विजय उजव्या हाताचा फलंदाज आणि उजवा हाताचा मध्यम वेगवान गोलंदाज आहे. त्यानं आतापर्यंत 1 प्रथम श्रेणी आणि 7 टी -20 सामने खेळले आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यानं एका सामन्यात 85 धावा आणि 6 विकेट घेतले आहेत. त्याचबरोबर, 7 टी -20 सामन्यात 19 धावा केल्या आहेत. तर, 9 विकेटही घेतल्या आहेत. दिग्विजय देशमुख देशांतर्गत क्रिकेटमध्ये महाराष्ट्राकडून खेळतो. त्याने डिसेंबरमध्येच रणजी सामन्यात फर्स्ट क्लासमध्ये प्रवेश केला आहे. देशमुख महाराष्ट्रात रणजी करंडक स्पर्धेत खेळला. त्याने 71 चेंडूत 83 धावा केल्या. त्यात सात चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता परंतु तो आठव्या क्रमांकावर पोहोचला. त्यामुळं जम्मू-काश्मीरच्या संघापासून आपल्या संघाला पराभूत होण्यापासून तो वाचवू शकला नाही. वाचा- IPLसाठी कुंबळेचा खास प्लॅन, दिग्गज मुंबईकर खेळाडू झाला पंजाबचा बॅटिंग कोच 2013मध्ये प्रदर्शित झाला ‘काय पो चे’ काय पो चे हा चित्रपट 2013मध्ये आला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली होती. सुशांत सिंग राजपूतसोबत, राजकुमार राव, अमित साध, मानव कौल असे सुप्रसिद्ध कलाकार ही होते. हा चित्रपट लेखक चेतन भगत यांच्या ‘थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाइफ’ या प्रसिद्ध पुस्तकावर आधारित आहे. यात तीन मित्र असतात ज्यांनी त्यांचे गणित प्रशिक्षण आणि क्रिकेट अकादमी उघडली होती. मात्र दंगलीच्या चर्चेत तिघांची मैत्रीची खरी परीक्षा आणि अली हाश्मी यांना हे तीन क्रिकेटपटू कसे बनवता येतील, हे सर्व चित्रपटात दाखवले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक कपूर यांनी केले होते. वाचा- पाचव्यांदा चॅम्पियन होण्यासाठी पलटन सज्ज! असा आहे मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ **मुंबईकडे शिल्लक रक्कम-**1.95 कोटी टोटल स्लॉटः 1 ओवरसीज स्लॉटः 0 टॉप ऑर्डर फलंदाज: रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, क्विंटन डिकॉक, आदित्य तारे, अनमोलप्रीत सिंह, ख्रिस लिन. फिनिशर: किरन पोलार्ड, इशान किशन, शेरफने रदरफोर्ड, सौरभ तिवारी. ऑलराउंडर: हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, प्रिन्स बलवंत राय. स्पिनर: राहुल चाहर, जयंत यादव, अनुकूल रॉय. जलद गोलंदाज: जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा, ट्रेंट बोल्ट, धवल कुलकर्णी, मिशेल मॅक्लिनेगन, नॅथन कूल्टर नाइल, मोहसिन खान, दिग्विजय देशमुख.