JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / ... अन् भारताचा स्टार फुटबॉलपटू सुनील छेत्री चक्क झाला 'प्रेग्नेंट'; 'त्या' खास गोल सेलिब्रेशननं वेधलं लक्ष Video

... अन् भारताचा स्टार फुटबॉलपटू सुनील छेत्री चक्क झाला 'प्रेग्नेंट'; 'त्या' खास गोल सेलिब्रेशननं वेधलं लक्ष Video

भारताच्या स्टार फुटबॉलपटू सुनील छेत्रीनं गोल केल्याचं असं काही सेलिब्रेशन केलं आहे की त्याच्या चाहत्यांना सुखद धक्काच बसला आहे.

जाहिरात

'त्या' खास गोल सेलिब्रेशननं वेधलं लक्ष

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दिल्ली, 13, जून: क्रिकेटचं मैदान असो, हॉकीचं ग्राउंड असो की मग फुटबॉलचं ग्राउंड नेहमीच काही ना काही मजेशीर आणि सुखद घटना घडतच असतात. त्यात खेळाडूंची सेलीब्रेशन करण्याची पद्धत निराळीच असते. कोणी उड्या मारून तर कोणी मैदानभर धावून किंवा कोण चक्क टी-शर्ट काढून सेलिब्रेशन करत असतात. फ़ुटबॉलच्या मैदानातही असंच काहीसं घडत असतं. पण भारताच्या स्टार फुटबॉलपटू सुनील छेत्रीनं गोल केल्याचं असं काही सेलिब्रेशन केलं आहे की त्याच्या चाहत्यांना सुखद धक्काच बसला आहे. सध्या इंटरकॉन्टिनेंटल चषक 2023 सुरु आहे. यामध्ये भारत विरुद्ध वानुआतू हा सामना सुरु होता. या सामन्यादरम्यान सुनील छेत्रीनं गोल केला. पण त्यानंतरचं त्याच सेलिब्रेशन हे एक गुड न्यूज देणारं होतं. ते बघून मैदानात असलेली त्याची पत्नीही उठून टाळ्या वाजवू लागली. Tushar Deshpande: चेन्नई सुपर किंग्जचा स्टार खेळाडू तुषार देशपांडेचा झाला साखरपुडा, बालपणीच्या क्रशसोबत करणार लग्न सुनील छेत्री झाला प्रेग्नेंट या सामन्यात सुनीलनं गोल केल्यांनतर एकच जल्लोष सुरु झाला. मात्र त्यातही सुनीलनं बॉल उचलून आणला आणि त्याच्या टीशर्टमध्ये आणि पोटाच्या मध्ये ठेवला जणू काही तो गरोदर आहे. पण याचं नेमकं कारण काय हे समजल्यानंतर त्याचे चाहते आणखीनच खुश झाले. खरं म्हणजे सुनील छेत्रीची पत्नी गरोदर आहे आणि त्यांना लवकरच बाळ होणार आहे. हीच बातमी चाहत्यांना देण्यासाठी त्यानं हे भन्नाट सेलिब्रेशन केलं.

संबंधित बातम्या

भारतीय फुटबॉल संघानं त्याच्या या गोलचा आणि भन्नाट सेलिब्रेशनचा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. मात्र ही गुड न्यूज फक्त सुनील छेत्रीच नाही तर त्याच्या चाहत्यांनासाठीही अनपेक्षित होती. या सुखद धक्क्यामुळे त्याच्या सर्व फॅन्सना आनंद झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या