भारताचा कर्णधार विराट कोहली सातव्या स्थानी आहे.
नवी दिल्ली, 26 डिसेंबर : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली म्हणजेच रनमशीननं आतापर्यंत सर्वच विक्रमांना गवसणी घातली आहे. 2019 हे वर्ष विराटसाठी कर्णधार म्हणून खास राहिले नसले तरी, त्यानं फलंदाज म्हणून खोरानं धावा काढल्या. त्यामुळं वर्षाअखेरीस एक गिफ्ट मिळाले. Wisden च्या cricketers of decade या यादीत विराटचा TOP 5 खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला आहे. गेल्या 10 वर्षात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा या यादीत समावेश होतो. विराट कोहलीसोबत या यादीत गोलंदाज आर अश्विन आठव्या क्रमांकावर आहे. तर, डेल स्टेन, एबी डिव्हीलियर्स, स्टिव्ह स्मिथ आणि महिला क्रिकेटपटू एलिस पेरीचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. विराट कोहलीने गेल्या 10 वर्षात तब्बल 5 हजार 775 धावा केल्या. 5 वर्षांत विराटने 63च्या सरासरीने धावा काढल्या असून यात 21 शतकं आणि 13 अर्धशतकांचा समावेश आहे. म्हणूनच विराटच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवण्याच आल्याचे Wisdenच्या वतीनं सांगण्यात आले आहे. वाचा- VIDEO : 130 किमी वेगानं आला चेंडू, फलंदाज जमिनीवर आणि स्टम्प हवेत!
वाचा- विराट आणि शास्त्रींमुळे संपणार होते मुंबईकर खेळाडूचे करिअर, धक्कादायक खुलासा हे आहेत दशकातील टॉप 11 खेळाडू 1. अॅलिस्टर कूक (इंग्लंड) 2. डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया) 3. कुमार संगाकारा (श्रीलंका) 4. स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया) 5. विराट कोहली (भारत) 6. बेन स्टोक्स (इंग्लंड) 7. एबी डी व्हिलिअर्स (दक्षिण आफ्रिका) 8. रविचंद्रन अश्विन (भारत) 9. डेल स्टेन (दक्षिण आफ्रिका) 10. कॅगिसो रबाडा (दक्षिण आफ्रिका) 11. जेम्स अँडरसन (इंग्लंड) वाचा- धोनीच्या लाडक्या खेळाडूची कमाल, शतकी खेळी करत महाराष्ट्राचा डाव सावरला विराटची या दशकातील कामगिरी– धावा – 11 हजार 125 शतके – 42 अर्धशतके – 52 मॅन ऑफ द मॅच– 35 मॅन ऑफ द सिरीज – 7 चौकार – 1038 कॅच – 117 सामने – 227