मुंबई, 02 मार्च : भारताचा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेचा न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यावेळी त्याच्या चिमुकल्या मुलीसोबतचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेवेळी अजिंक्य रहाणेला मुलगी झाली. न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेदरम्यान एका मुलाखतीत त्यानं बाप झाल्याचा आनंद साजरा करत असल्याचं म्हटलं होतं. मुलगी झाल्याचा आनंद व्यक्त करताना अजिंक्य रहाणेनं हा आशीर्वाद असल्याचं सांगितलं होतं. अजिंक्यची पत्नी राधिकाने 5 ऑक्टोंबर रोजी मुलीला जन्म दिला. त्यानंतर एक महिन्याने अजिंक्यने मुलीचा फोटो शेअर करताना तिचं नावही सांगितलं. त्याच्या मुलीचं नाव आर्या ठेवलं आहे. फोटो शेअर करताना त्यावर आर्या अजिंक्य रहाणे असा कॅप्शन त्याने दिला. आर्याचा जन्म झाला त्यावेळी अजिंक्य रहाणे विशाखापट्टणम इथं कसोटी मालिकेत खेळत होता. त्या सामन्यानंतर अजिंक्य पत्नी आणि मुलीला भेटला होता.
भारताच्या इतर खेळाडूंच्या पत्नी अनेकदा मैदानावर दिसतात. मात्र अजिंक्य रहाणेची पत्नी राधिका मात्र या सगळ्यापासून दूर असते. याबद्दल अजिंक्य रहाणेनंही खुलासा केला होता. तो म्हणाला होता की, राधिकाला लाइमलाइट आवडत नाही. बाहेरून हे सोपं वाटत असलं तरी साथीदारासाठी ही कठिण गोष्ट आहे. कारण तुम्हाला जास्तकाळ एकत्र रहायला मिळत नाही. त्यामुळे जेव्हा दौऱ्यावर असतो तेव्हा थकवा आलेला असतानाही बाहेर कुठेतरी जाण्याचं प्लॅनिंग करतो असं रहाणेनं सांगितलं होतं. हे वाचा : IPL मध्ये धोनी धमाकेदार कमबॅकच्या तयारीत, एयरपोर्टवर चाहत्यांनी केलं जंगी स्वागत