JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Virat Kohli आणि Babar Azam आता एकाच टीमकडून खेळणार! प्रत्येक वर्षी होणार सीरिज

Virat Kohli आणि Babar Azam आता एकाच टीमकडून खेळणार! प्रत्येक वर्षी होणार सीरिज

भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात ऑक्टोबर महिन्यात टी-20 वर्ल्ड कपची (T20 World Cup) मॅच होणार आहे. या मॅचची तिकीटं अवघ्या काही मिनिटांमध्ये संपली, त्यावरूनच या दोन देशांमध्ये होणाऱ्या मॅचची क्रिकेट रसिक किती आतुरतेने वाट पाहत असतात, हे दिसून येतं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 जून : भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात ऑक्टोबर महिन्यात टी-20 वर्ल्ड कपची (T20 World Cup) मॅच होणार आहे. या मॅचची तिकीटं अवघ्या काही मिनिटांमध्ये संपली, त्यावरूनच या दोन देशांमध्ये होणाऱ्या मॅचची क्रिकेट रसिक किती आतुरतेने वाट पाहत असतात, हे दिसून येतं. दोन्ही देशांमध्ये संबंध ताणले गेले असल्यामुळे 2012-13 नंतर द्विपक्षीय सीरिज झालेली नाही. आयपीएलमध्येही पाकिस्तानी खेळाडूंच्या खेळण्यावर बंदी आहे, पण आता भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू एकत्र खेळताना दिसू शकतात. विराट कोहली (Virat Kohli) आणि बाबर आझम (Babar Azam) एकाच टीमकडून खेळण्यासाठी जोरदार प्लानिंग सुरू आहे. फोर्ब्सने दिलेल्या वृत्तानुसार, आयसीसीच्या पुढच्या महिन्यात होणाऱ्या बैठकीत आशियाई क्रिकेट काऊन्सिलचे अध्यक्ष जय शाह, आफ्रिकन असोसिएशनचे नवीन अध्यक्ष सुमोद दामोदार, एसीसी डेव्हलपमेंट कमिटीचे अध्यक्ष माहिंदा वल्लीपुरम सामील होणार आहेत. या बैठकीत आफ्रो-आशिया कपचा प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता आहे. आशियन क्रिकेट काऊन्सिलचे कमर्शियल आणि इव्हेंट प्रमुख प्रभाकरन थनराज यांनी भारत किंवा पाकिस्तानकडून आफ्रो-आशिया कपचा प्रस्ताव आणण्याची शक्यता कमी आहे, पण आम्हाला अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया दिली. दोन्ही बोर्डांकडून आम्हाला सहमती देण्यात आलेली नाही, पण आम्ही याचं प्लानिंग करत आहोत. भारत आणि पाकिस्तानच्या सर्वोत्तम खेळाडूंना आशियाई टीममध्ये सामील करण्याची आमची योजना आहे. या सगळ्याला अंतिम रूप आलं की आम्ही स्पॉन्सरशीप आणि ब्रॉडकास्टरसाठी मार्केटमध्ये उतरू, असं त्यांनी सांगितलं. सगळं काही ठीक झालं तर या इव्हेंटच्या माध्यमातून भारत आणि पाकिस्तान बोर्डांमधला वाद दूर व्हायला मदत होईल, असं सुमोद दामोदर म्हणाले. तसंच प्रत्येक वर्षी या स्पर्धेचं आयोजन केलं, तर आफ्रिकी बोर्डांना याचा फायदा होईल, कारण त्यांना सध्या आर्थिक समर्थन द्यायची गरज आहे, असंही त्यांनी सांगितलं. याआधी 2000 सालच्या मध्यात आशिया इलेव्हनसाठी शोएब अख्तर, शाहिद आफ्रिदी, वीरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविड खेळले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या