india vs west indies
नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी: वेस्ट इंडिजची टीम 3 वनडे आणि 3 टी-20 मॅचच्या सीरिजसाठी भारत दौऱ्यावर (India vs West Indies) येणार आहे. भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) यांच्यात 6 फेब्रुवारीपासून तीन सामन्यांची वनडे सीरिज रंगणार आहे. वनडे कर्णधार म्हणून रोहित शर्माची ही पहिली वनडे सीरिज असेल. तर वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे सीरिजसाठी डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवचे(Kuldeep Yadav) संघात पुनरागमन झाले आहे. यादवने गेल्या सहा महिन्यांपासून कोणतेही क्रिकेट खेळलेले नाही. वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे सीरिजसाठी भारताचा अनुभवी फिरकीपटू कुलदीप यादवला (Kuldeep Yadav) बऱ्याच काळानंतर संधी देण्यात आली. त्याने अखेरचा सामना जुलै 2021 मध्ये खेळला होता. ऑफस्पिनर आर अश्विनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध फारशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे कुलदीपचे पुनरागमन महत्त्वाचे मानले जात आहे. वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी एकदिवसीय सामन्यांमध्ये फिरकी गोलंदाजांविरुद्ध चांगली कामगिरी केलेली नाही. कुलदीपने 8 देशांमध्ये एकदिवसीय सामन्यांमध्ये संघाला विजय मिळवून दिला आहे. 65 मॅचमध्ये 107 बळी कुलदीप यादवच्या एकदिवसीय कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने 65 सामन्यांत 28 च्या सरासरीने 107 बळी घेतले आहेत. 25 धावांत 6 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याच्या एकूण लिस्ट ए कारकिर्दीबद्दल बोलायचे तर त्याने 121 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच वेळी, टी-20 च्या एकूण 98 डावांमध्ये त्याने 22 च्या सरासरीने 122 विकेट घेतल्या आहेत. 17 धावांत 5 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. संघाने 44 सामने जिंकले कुलदीव यादवच्या उपस्थितीत टीम इंडियाने 65 एकदिवसीय सामन्यांपैकी 44 सामने जिंकले आहेत. भारताने 14 सामन्यांमध्ये सर्वाधिक सामने जिंकले आहेत. याशिवाय इंग्लंडमध्ये 7 सामने, दक्षिण आफ्रिका आणि यूएईमध्ये 5-5, श्रीलंका आणि वेस्ट इंडिजमध्ये 4-4, न्यूझीलंडमध्ये 3 आणि न्यूझीलंडमध्ये 2 सामने जिंकले आहेत. कुलदीप आणि युझवेंद्र चहल ही जोडी भारताच्या यशस्वी जोडींपैकी एक आहे. दक्षिण आफ्रिकेत नुकत्याच झालेल्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत टीम इंडियाला 0-3 असा पराभव पत्करावा लागला होता.