विशाखापट्टणम, 05 ऑक्टोबर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होत असलेल्या कसोटी सामन्या रोहित शर्मा सलामीचा फलंदाज म्हणून शानदार कामगिरी करत आहे. पहिल्या कसोटी सामन्यात दोन्ही डावांमध्ये रोहित शर्मानं शतकी कामगिरी करण्याचा पराक्रम केला आहे. दुसऱ्या डावात रोहितनं 133 चेंडूत आपलं शतक पूर्ण केले. यात 9 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. सलामीला फलंदाज म्हणून पहिल्यांदाच मैदानात उतरलेल्या रोहितनं विक्रमांचे सर्व डोंगर जवळ जवळ सर केले आहेत. दरम्यान पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या डाव्य़ातील 7 बाद 502 धावांच्या प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिका संघानं 431 धावा केल्या. भारतानं 71 धावांच्या आघाडीसह डावाची सुरुवात केली. मात्र दुसऱ्या डावात सलामीवीर रोहित आणि मयंक यांना चांगली सुरुवात करता आली नाही. मयंक केवळ 7 धावा करत माघारी परतला. त्यानंतर रोहितनं अर्धशतकी खेळी केली. यासह रोहितनं क्रिकेटमध्ये कोणालाही न जमलेली कामगिरी केली आहे. रोहितनं या सामन्यात दी वॉल असलेल्या द्रविडचा विक्रम मोडला. रोहित आणि चेतेश्वर पुजारा यांनी शतकी भागिदारी केल्यानंतर पुजारा 81 धावांवर बाद झाला.
रोहित शर्मा ठरला षटकारांचा बादशाह रोहित शर्मा एका कसोटी सामन्यात 9 किंवा त्यापेक्षा जास्त षटकार ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज ठोकला आहे. रोहितने पहिल्या डावात शतकी खेळी करताना 6 षटकार ठोकले होते. दुसऱ्या डावात 4 षटकार खेचले आहेत. यासह रोहितने सिद्धू यांच्या नावावर असलेला विक्रम मोडला. सिद्धू यांनी 1994मध्ये लखनौ कसोटीत श्रीलंकेविरुद्ध 8 षटकार ठोकले होते. याचसोबत कसोटी, टी-20 आणि वन-डे अशा तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये एका सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रमही रोहित शर्माच्या नावे जमा झाला आहे. रोहित शर्मानं अनोखं द्विशतक रोहित शर्मा दक्षिण आफ्रिकेविरोद्धात मैदानात उतरला तेव्हा त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून 200वा डाव खेळण्यास सुरूवात केली. भारतीय संघाकडून सलामीवीर म्हणून 200डाव खेळणारा रोहित शर्मा आठवा फलंदाज ठरला. याआधी विरेंद्र सेहवाग 388 डावांसह अव्वल स्थानी आहे. त्या पाठोपाठ सचिन तेंडुलकर (342), सुनील गावसकर (286), शिखर धवन (243), सौरव गांगुली (237), गौतम गंभीर (228), क्रिश्नमचारी श्रीकांत (217) यांनी 200 डाव खेळण्याचा विक्रम केला आहे. द वॉलला टाकले मागे एकाच कसोटी सामन्यात शतक आणि अर्धशतकी कामगिरी करणारा रोहित 17वा फलंदाज आहे. रोहितनं मायदेशात आतापर्यंत 7 अर्धशतक करण्याचा विक्रम केला आहे. यासह रोहितनं राहुल द्रविडला मागे टाकले आहे. राहुल द्रविडनं 6वेळा अर्धशतकी कामगिरी केली आहे. VIDEO: निवडणुकीच्या रणधुमाळीत नवरात्राची धूम, गरब्यामध्ये मोदीच मोदी!
=