ऑकलंड, 24 जानेवारी : भारतीय क्रिकेट संघाला न्यूझीलंडच्या धर्तीवर पाच टी-20 सामने खेळायचे आहेत. यातील पहिल्या टी-20 सामन्यात भारतानं विजयी शुभारंभ करत या मालिकेत 1-0ने आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारतानं 204 धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करत जगातल्या कोणत्याही संघाविरुद्ध टीम इंडिया विजय मिळवू शकतो हे सिद्ध केले आहे. या सामन्यात विराट कोहली आणि केएल राहुल यांनी शतकी भागीदारी केली. मात्र या दोन्हीही फलंदाज बाद झाल्यानंतर फलंदाजीची धुरा युवा फलंदाज श्रेयस अय्यरनं आपल्या खांद्यावर घेतली आणि 58 धावांची मॅचविनिंग खेळी केली. या सामन्यात श्रेयसनं 5 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीनं 200च्या स्ट्राईक रेटनं केवळ 29 चेंडूत 58 धावा केल्या. मुळात श्रेयसनं 7 चेंडूत 6 धावांची गरज असताना 19व्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर षटकार मारत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. विराटच्या या खेळीच्या जोरावर च्याला सामनावीर पुरस्कारही देण्यात आला. वाचा- विराटसेनेचा विजयी शुभारंभ! टीम इंडियानं 6 विकेटनं जिंकला सामना
श्रेयस अय्यरच्या या अर्धशतकी खेळीच्या जोरावर चाहत्यांना अय़्यरनं धोनीची आठवण करून दिली. हे श्रेयस अय्यरच्या आंतरराष्ट्रीय टी -20 कारकीर्दीतील दुसरे अर्धशतक होते. त्याने आपल्या कारकीर्दीत आत्तापर्यंत 18 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 26.83 च्या सरासरीने एकूण 322 धावा केल्या असून त्याने नागपुरात बांगलादेशविरुद्ध खेळलेला 62 धावांचा सर्वोत्तम डाव आहे. वाचा- VIDEO : हिटमॅन की सुपरमॅन? हवेत उडी मारत रोहितनं घेतला अविश्वसनीय कॅच
वाचा- IPL 2020मध्ये शुभमन गील होणार KKRचा कर्णधार? शाहरुखनं केला खुलासा या सामन्यात भारतीय संघाला विजयासाठी 204 धावांचे लक्ष्य होते, जे भारतीय संघाने सहा गडी राखून मिळवले. टीम इंडियाची चांगली सुरुवात मिळाली नाहीस कारण रोहित अवघ्या सात धावांवर बाद झाला. यानंतर केएल राहुलने 56 आणि विराटने 45 धावांचा डाव खेळला आणि श्रेयस अय्यरला विजयाचा पाया दिला. श्रेयसच्या न्यूझीलंडमधील कारकिर्दीतील हा पहिला टी-२० सामना होता, आता दुसरा टी-20 सामना 26 जानेवारी रोजी होणार आहे.