इंदूर, 12 नोव्हेंबर : भारत-बांगलादेश यांच्यात टी-20 मालिका झाल्यानंतर आता दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिका होणार आहे. 14 नोव्हेंबरपासून इंदूरमध्ये पहिल्या कसोटी सामन्याता सुरुवात होणार आहे. यावेळी भारतीय संघाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे यांने पत्रकार परिषदत घेत ऐतिहासिक टे-नाईट सामना आणि कसोटी सामन्याबाबत माहिती दिली. रहाणेन पत्रकार परिषेदत डे-नाईट सामन्याआधी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या याबाबत सांगितले. तसेच, या ऐतिहासिक सामन्यात चेतेश्वर पुजारा, मयंक अग्रवाल, मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा यांच्यासोब रहाणेनं राहुल द्रविडच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत सराव केला. यावेळी राहणेनं, “गुलाबी चेंडूनं सामना खेळणे फार कठिण असणार आहे. तसेच, लाल चेंडूनं खेळताना शरीरपासून थोडी दूर फलंदाजी करावी लागले. बांगलादेश आणि भारत यांच्यात 22 नोव्हेंबरला डे-नाईट कसोटी सामना होणार आहे. याबाबत सांगताना रहाणेनं, “आम्ही दोन अभ्यास सत्रांमध्ये भाग घेतला. मी पहिल्यांदा गुलाबी चेंडूने खेळत आहोत. नक्कीच गुलाबी चेंडूसोबत खेळणे कठिण असणार आहे. त्यामुळं आमचे लक्ष हे स्विंग आणि सीमवर असणार आहे”, असे सांगितले. तसेच, लाल चेंडूपेक्षा गुलाबी चेंडूनं फलंदाजी करणे जास्त कठिण आहे असेही रहाणेनं मान्य केले. वाचा- रोहित शर्मा सुसाट, कर्णधार कोहलीचा ‘ताज’ येणार धोक्यात!
वाचा- स्मार्ट गोलंदाजानं अम्पायरला दिला चकवा! हा VIDEO एकदा पाहाच असा असेल डे-नाईट सामना नोव्हेंबरमध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या गुलाबी पर्वाची सुरुवात इडन गार्डन्स मैदानावरून होणार आहे. आगामी भारतीय दौऱ्यावर बांगलादेशचा संघ (Bangladesh Cricket Team) इडन गार्डन्स (Eden Gardens)मैदानावर डे/नाईट कसोटी सामना खेळणार आहे. यासंदर्भात भारतीय क्रिकेट नियामक मंडळा(BCCI)ने दिलेल्या प्रस्तावाला बांगलादेश क्रिकेट बोर्डा(Bangldesh Cricket Board)ने हिरवा कंदील दाखवला आहे. जागतिक क्रिकेटमध्ये डे/नाईट कसोटीला आधीच सुरुवात झाली आहे. पण भारतात हा पहिलाच अशा प्रकारचा सामना होत आहे. वाचा- असा गोलंदाज होणे नाही! 72 तासांत भारतीय गोलंदाजानं घेतली दुसरी हॅट्रिक डे-नाईट सामन्याचे नियम पारंपारिक कसोटी सामने हे लाल चेंडूवर खेळले जात असले तरी दिवस-रात्र कसोटी सामन्यांमध्ये वापरला जाणारा चेंडू मात्र गुलाबी रंगाचा असतो. रात्री प्रकाशझोतात चेंडू पटकन दिसावा म्हणून हा बदल करण्यात आला आहे. आतापर्यंत कुकाबुरा या कंपनीचेच गुलाबी चेंडू वापरले गेले आहेत. इतर प्रथम श्रेणी क्रिकेट प्रमाणेच डे-नाईट टेस्टमध्ये 80 षटकानंतर नवा चेंडू घेता येतो. डे- नाईट कसोटी सामन्यांमध्येसुध्दा दिवसाला सहा तास आणि 90 षटकांच्या खेळाचे नियोजन असते. यात फॉलोऑन नचा नियम डे- नाईट कसोटीसाठी मात्र वेगळा आहे. पारंपरिक कसोटी सामन्यात पहिल्या डावाअखेर 200 धावांची आघाडी असली तर फॉलोऑन देता येता. दिवस -रात्र सामन्यात हीच आघाडी 150 धावांची असली तरी फॉलोऑन देता येतो.