नवी दिल्ली, 03 फेब्रुवारी: क्रिकेट विश्वातून (Cricket World) एक चांगली बातमी समोर येत आहे. टीम इंडियानं (Team India) सलग चौथ्यांदा आणि ओव्हरऑल आठव्यांदा अंडर-19 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये एन्ट्री केली आहे. टीम इंडियानं (Under-19 World Cup Semifinal)सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा 96 रन्सनी पराभव केला. कॅप्टन यश धुलचं (Yash Dhull)शतक आणि शेख रशीदच्या 204 रन्सच्या भागीदारीमुळे टीम इंडियानं निर्धारित 50 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 290 रन केले. 291 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची टीम 41.5 ओव्हरमध्ये 194 रन ऑलआऊट झाली. आता फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना शनिवारी, 5 फेब्रुवारीला अँटिग्वा येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर इंग्लंडशी होणार आहे. अँटिग्वा येथील कूलिज क्रिकेट मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात कॅप्टन यश धुलनं (Yash Dhull) टीम इंडियासाठी 110 रन्सची जबरदस्त कामगिरी केली. त्याने 110 बॉलमध्ये 10 फोअर आणि 1 सिक्स लगावला. शेख रशीदची सेन्चुरीअवघ्या 6 रन्सनी हुकली. रशीदने 108 बॉलमध्ये 8 फोअर आणि 1 सिक्स लगावला. काही वेळासाठी टीम इंडिया संकटात सापडली होती. कारण 2 विकेट्स 37 रनच्या टीम स्कोरवर पडले होते. मात्र यश धुल आणि शेख रशीदनं तिसऱ्या विकेटसाठी 204 रन जोडून टीम इंडियाला मजबूत स्थितीत आणलं.
लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया टीमकडून लेचलान शॉने सर्वाधिक 51 रन्स केले. त्याने 66 बॉल्सच्या खेळीत 4 फोअर मारले, जे टीमच्या 178 रन्सवर 9वी विकेट म्हणून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याच्याशिवाय कोरी मिलरने 38 आणि ओपनर कॅम्पबेलने 30 रन्सचे योगदान दिले. भारताकडून लेफ्ट आर्म स्पिनर विकी ओस्तवालने 42 रन देऊन 3 विकेट्स घेतल्या. त्यांच्याशिवाय निशांत सिंधू आणि रवी कुमार यांनीही 2-2 विकेट घेतल्या. कौशल तांबे आणि अंगक्रिश रघुवंशी यांनी 1-1 विकेट घेतली.
ऑस्ट्रेलियाची पहिली विकेट अवघ्या 3 रन्सवर पडली, जेव्हा टी विली (1) खेळाच्या दुसऱ्या ओव्हरमध्येच रवी कुमारनं lbw वर आऊट केलं. यानंतर कॅम्पबेल आणि कोरी मिलर यांनी दुसऱ्या विकेटसाठी 68 रन्सची भागीदारी केली. रघुवंशीने ही भागीदारी मोडून काढत कोरीला lbw करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर विकेट पडण्याची प्रक्रिया सुरूच राहिली. केवळ शॉ च भारतीय बॉलरचा कडवटपणे सामना करू शकला. जॅक सेनफेल्डनेही 14 बॉलमध्ये 2 फोअर आणि 1 सिक्सच्या मदतीने 20 रन्स केले.
याआधी भारताची सुरुवात काही खास झाली नव्हती. टीमला पहिला धक्का अंगक्रिश रघुवंशी (6) च्या रूपाने बसला, जो खेळाच्या 8व्या ओव्हरमध्ये विलियम साल्जमैनच्या ओव्हरमध्ये बोल्ड झाला. यानंतर हरनूर सिंग 37 रन्सवर बाद झाला. त्याने 28 बॉलमध्ये 3 रन्सच्या मदतीने 16 रन्स केले. त्यानंतर यश आणि रशीदने कमाल दाखवली. यशने 106 बॉलमध्ये सेन्चुरी पूर्ण केली. टॉम व्हिटनीच्या खेळातील 45व्या ओव्हरमधील दुसऱ्या आणि तिसऱ्या बॉलवर त्यानं सलग फोअर लगावले. त्यानंतर चौथ्या बॉलवर रन घेतला आणि 2 धावा पूर्ण केल्या. त्यामुळे त्याची सेन्चुरी पूर्ण झाली. या टूर्नामेंटमधील यशचे हे पहिलीच सेन्चुरी होती. खेळाच्या 46व्या ओव्हरमधील 5व्या बॉलवर 110 च्या रन्सवर तो रन आऊट झाला. पुढच्याच बॉलवर शेख रशीदला निस्बेटने सिनफिल्डच्या हातात कॅच देऊन आऊट केलं.