JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / मी पुन्हा येईन... मी पुन्हा येईन...! भारताच्या क्रिकेटपटूचा दावा

मी पुन्हा येईन... मी पुन्हा येईन...! भारताच्या क्रिकेटपटूचा दावा

भारत आणि बांगलादेश यांच्यात गुरुवारपासून पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे.

जाहिरात

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 3 कसोटी सामन्यांची मालिका बुधवारपासून सुरू होणार आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या दृष्टीने दोन्ही देशांसाठी ही कसोटी मालिका महत्त्वाची असणार आहे. दरम्यान, भारताच्या काही खेळाडूंची संघात स्थान टिकवण्यासाठी कसोटी लागणार आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 नोव्हेंबर : भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना गुरुवारपासून सुरू होणार आहे. त्याआधी कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेनं पत्रकारांशी संवाद साधला. फॉर्ममध्ये नसल्यानं त्याच्यावर टीका केली जात होती. मात्र, विंडीजविरुद्धच्या मालिकेत त्यानं पुनरागमन केलं. कसोटीत आपलं स्थान टिकवणाऱा अजिंक्य रहाणे एकदिवसीय संघात मात्र जागा मिळवू शकलेला नाही. त्यामुळेच पत्रकारांशी बोलताना त्याने मी एकदिवसीय संघात नक्कीच पुनरागमन करेन असं म्हटलं आहे. अजिंक्य रहाणे म्हणाला की, कसोटी सामन्यात मला चांगलं खेळायचं आहे. चांगला खेळ करत रहायचं असून मला विश्वास आहे मी एकदिवसीय संघात पुनरागमन करेन. तुमचा स्वत:वर किती विश्वास आहे यावर सर्व अवलंबून असतं. तुम्ही वर्तमानात रहायला हवं. कसोटीत माझी कामगिरी उंचावली आणि संघाच्या विजयात त्याचा वाटा असेल तर एकदिवसीय संघात पुनरागमनं नक्की करेनं असंही अजिंक्य रहाणेनं म्हटलं. वेस्ट इंडिजविरुद्ध 2016 मध्ये अजिंक्य रहाणे त्याचा अखेरचा टी20 सामना खेळला होता. तर एकदिवसीय संघात गेल्या वर्षभरापासून रहाणेला स्थान मिळालेलं नाही. गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अजिंक्य रहाणेनं शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. आता कसोटीत चांगली कामगिरी करून त्याला एकदिवसीय संघात स्थान मिळवायचे आहे. बांगलादेशविरुद्ध भारताने टी20 मालिका 2-1 ने जिंकली आहे. पहिला सामना बांगलादेशने जिंकल्यानंतर भारताने शेवटच्या दोन सामन्यात बाजी मारली. अखेरच्या सामन्यात दीपक चहरच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतानं 30 धावांनी विजय मिळवला. आता दोन कसोटी सामन्यांची मालिका गुरुवारपासून सुरू होणार आहे. जाणून घ्या राष्ट्रपती राजवट कधी लागू होते आणि त्यानंतर राज्यकारभार चालतो कसा VIDEO : भाजपसोबत सरकार स्थापन करणार का? उद्धव ठाकरेंनी दिलं ‘हे’ उत्तर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या