Photo-BCCI
कोलकाता, 20 फेब्रुवारी : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातली तिसरी टी-20 मॅच (India vs West Indies 3rd T20) आज कोलकात्याच्या इडन गार्डनमध्ये होणार आहे. तिसरी आणि अखेरची टी-20 मॅच जिंकून वेस्ट इंडिजला वनडे पाठोपाठ टी-20 सीरिजमध्येही व्हाईट वॉश करण्यासाठी टीम इंडिया आग्रही असेल, पण कोलकात्याच्या हवामान यामध्ये अडथळा (Kolkata Weather) ठरू शकतं. कोलकात्यामध्ये सध्या पाऊस सुरू आहे, त्यामुळे इडन गार्डनच्या (Eden Garden) मैदानात कव्हर घालण्यात आली आहेत. रात्रीच्या वेळी कोलकात्यामध्ये पावसाची शक्यता 42 टक्के असेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पहिल्या टी-20 मध्ये टीम इंडियाचा 8 रननी आणि दुसऱ्या टी-20 मध्ये 6 विकेटने विजय झाला होता. तिसऱ्या टी-20 मधून विराट कोहली आणि ऋषभ पंत यांना विश्रांती देण्यात आली आहे, त्यामुळे नव्या खेळाडूंना संधी मिळणार आहे.
पहिल्या दोन मॅचप्रमाणेच तिसऱ्या सामन्यातही रनचा डोंगर पाहायला मिळू शकतो. धुकं आणि पावसाच्या शक्यतेमुळे टॉस जिंकून टीम पहिले बॉलिंगचा निर्णय घेईल हे निश्चितम मानलं जातंय. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आतापर्यंत 19 टी-20 मॅच झाल्या आहेत. यातल्या 12 मॅचमध्ये टीम इंडियाचा तर 6 सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजचा विजय झाला, एक मॅचचा निकाल लागू शकला नाही. तिसऱ्या टी-20 सामन्याचा टॉस संध्याकाळी 6.30 वाजता तर मॅच 7.00 वाजता सुरू होणार होती, पण पावसामुळे मॅच सुरू व्हायला उशीर होण्याची शक्यता आहे. पाऊस कायम राहिला तर मॅच रद्द होईल किंवा कमी ओव्हरची खेळवली जाईल. भारतीय टीम रोहित शर्मा, ऋतुराज गायकवाड, इशान किशन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, रवी बिष्णोई, युझवेंद्र चहल, दीपक हुड्डा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आवेश खान