JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs WI : हिटमॅन बुधवारी होणार टीम इंडियाचा किंग! रोहित धोनीलाही मागे टाकणार

IND vs WI : हिटमॅन बुधवारी होणार टीम इंडियाचा किंग! रोहित धोनीलाही मागे टाकणार

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) रविवारी अहमदाबादमध्ये झालेल्या पहिल्या वनडेमध्ये (India vs West Indies)चांगली खेळी केली होती.

जाहिरात

Rohit Sharma

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अहमदाबाद, 8 फेब्रुवारी : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) रविवारी अहमदाबादमध्ये झालेल्या पहिल्या वनडेमध्ये (India vs West Indies)चांगली खेळी केली होती. 51 बॉलमध्ये एक सिक्स आणि 10 फोरच्या मदतीने त्याने 60 रन केले होते आणि टीमच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती. आता भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातली दुसरी वनडे बुधवारी 9 फेब्रुवारीला अहमदाबादमध्येच होणार आहे. या सामन्यात रोहित शर्माकडे एमएस धोनीचा (MS Dhoni) विक्रम मोडण्याची संधी आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये रोहितने एक सिक्स मारली. भारतीय जमिनीवर वनडेमधली ही त्याची 116 वी सिक्स होती. भारतात वनडेमध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याच्याबाबतीत रोहितने धोनीची बरोबरी केली आहे. धोनीने भारतातल्या वनडेमध्ये एकूण 116 सिक्स मारले आहेत. आता रोहितने एक सिक्स मारली तरी तो भारतात वनडेमध्ये सर्वाधिक सिक्स मारणारा खेळाडू होईल. भारतात वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्स मारणाऱ्या खेळाडूंमध्ये सचिन तेंडुलकर 71 सिक्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर युवराजच्या नावावर भारतात 63 सिक्स आहेत. याशिवाय भारतात विराट आणि गांगुलीने भारतात वनडेमध्ये 57-57 सिक्स लगावले आहेत, त्यामुळे विराट कोहलीकडेही गांगुलीला मागे टाकण्याची संधी आहे. भारतात वनडेमध्ये सर्वाधिक सिक्स 116 सिक्स - एमएस धोनी 116 सिक्स - रोहित शर्मा 71 सिक्स - सचिन तेंडुलकर 63 सिक्स - युवराज सिंग 57 सिक्स - सौरव गांगुली 57 सिक्स - विराट कोहली

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या