JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs SL 2nd Test : ऋषभ पंतने इतिहास घडवला, टेस्टमध्ये ठोकली Fastest Half Century

IND vs SL 2nd Test : ऋषभ पंतने इतिहास घडवला, टेस्टमध्ये ठोकली Fastest Half Century

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये (India vs Sri Lanka) ऋषभ पंतने (Rishabh Pant) इतिहास घडवला आहे. ऋषभ पंत टेस्ट क्रिकेटमध्ये सगळ्यात जलद अर्धशतक (Fastest Half Century in Test) झळकावणारा भारतीय खेळाडू ठरला आहे.

जाहिरात

Photo-BCCI

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बँगलोर, 13 मार्च : श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये (India vs Sri Lanka) ऋषभ पंतने (Rishabh Pant) इतिहास घडवला आहे. ऋषभ पंत टेस्ट क्रिकेटमध्ये सगळ्यात जलद अर्धशतक (Fastest Half Century in Test) झळकावणारा भारतीय खेळाडू ठरला आहे. ऋषभ पंतने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये 28 बॉलमध्येच त्याचं अर्धशतक पूर्ण केलं, पण यानंतर तो लगेचच आऊट झाला. 31 बॉलमध्ये 50 रनची खेळी करून पंत माघारी परतला, त्याच्या या खेळीमध्ये 7 फोर आणि 2 सिक्सचा समावेश होता. ऋषभ पंतच्या या खेळीमुळे भारताची या टेस्ट मॅचवरची पकड आणखी मजबूत झाली आहे. दुसऱ्या दिवसाची डिनरची विश्रांती झाली तेव्हा भारताचा स्कोअर 199/5 एवढा झाला आहे, त्यामुळे आघाडी 342 रनपर्यंत पोहोचली आहे. ऋषभ पंतआधी भारताकडून सगळ्यात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम कपिल देव (Kapil Dev) यांच्या नावावर होता. कपिल देव यांनी 1982 साली पाकिस्तानविरुद्ध 30 बॉलमध्ये अर्धशतक केलं होतं. तर शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) 2021 साली इंग्लंड दौऱ्यात 31 बॉलमध्ये हाफ सेंच्युरी झळकावली. वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) 2008 साली इंग्लंडविरुद्धच 32 बॉलमध्ये अर्धशतकी खेळी केली.

संबंधित बातम्या

याशिवाय ऋषभ पंत एकाच टेस्टच्या दोन्ही इनिंगमध्ये 150 पेक्षा जास्तच्या स्ट्राईक रेटने 30 पेक्षा जास्त रन करणारा जगातला पहिलाच खेळाडू ठरला आहे. पंतने पहिल्या इनिंगमध्ये 26 बॉल खेळून 150 च्या स्ट्राईक रेटने 39 रन केले होते. ऋषभ पंतने 30 टेस्टच्या 51 इनिंगमध्ये 40.85 च्या सरासरीने 1920 रन केले आहेत, यामध्ये 4 शतकं आणि 9 अर्धशतकांचा समावेश आहे. 159 रन हा त्याचा टेस्टमधला सर्वाधिक स्कोअर आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या