JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs SL : डे-नाईट टेस्टसाठी Axar Patel ची टीम इंडियात एण्ट्री, हा खेळाडू बाहेर

IND vs SL : डे-नाईट टेस्टसाठी Axar Patel ची टीम इंडियात एण्ट्री, हा खेळाडू बाहेर

भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातल्या 2 टेस्ट मॅचच्या सीरिजचा दुसरा आणि अखेरचा सामना 12 मार्चपासून सुरू होणार आहे. या टेस्टआधी टीम इंडियामध्ये अक्षर पटेलचं (Axar Patel) कमबॅक झालं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बँगलोर, 7 मार्च : भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातल्या 2 टेस्ट मॅचच्या सीरिजचा दुसरा आणि अखेरचा सामना 12 मार्चपासून सुरू होणार आहे. ही टेस्ट बँगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये डे-नाईट खेळवली जाणार आहे. भारताने मोहालीमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये श्रीलंकेचा इनिंग आणि 222 रननी पराभव केला होता. पिंक बॉल टेस्टआधी टीम इंडियामध्ये अक्षर पटेलचं (Axar Patel) कमबॅक झालं आहे. दुखापतीमुळे अक्षर टीमबाहेर गेला होता, त्यामुळे अक्षरऐवजी कुलदीप यादवला (Kuldeep Yadav) संधी देण्यात आली, पण आता अक्षरच्या पुनरागमनानंतर कुलदीपला टीममधून बाहेर करण्यात आलं आहे. क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार अक्षर पटेल दुखापतीतून पूर्णपणे बरा झाला आहे. अक्षर मोहाली टेस्टवेळीच टीम इंडियात दाखल झाला होता. टीममध्ये दोन डावखुरे स्पिनर असल्यामुळे आता तिसऱ्या स्पिनरची गरज नसल्याचं टीमचं म्हणणं आहे, त्यामुळे कुलदीप यादवला टीम बाहेर करण्यात आलं आहे. 18 सदस्यीय टीममध्ये आर.अश्विन आणि जयंत यादव हे दोन आणखी स्पिनरही आहेत. अक्षर पटेलने अखेरची टेस्ट डिसेंबर महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध मुंबईमध्ये खेळली होती. यानंतर दुखापतीमुळे टीमबाहेर गेला होता. आता श्रीलंकेविरुद्धच्या बँगलोर टेस्टसाठी तो निवडीसाठी उपलब्ध असेल. मोहाली टेस्ट भारताने तीन दिवसांमध्येच जिंकली होती. आता भारतीय टीम बुधवारपर्यंत मोहालीमध्येच राहणार आहे, त्यानंतर ते बँगलोरला रवाना होतील. भारतीय टेस्ट टीम रोहित शर्मा (कर्णधार), प्रियांक पांचाळ, मयंक अग्रवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत, रवींद्र जडेजा, जयंत यादव, आर अश्विन, अक्षर पटेल, सौरभ कुमार, मोहम्मद सिराज, उमेश यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या