JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / सुपर ओव्हर जिंकण्यामागचं रहस्य! विराटला केएल राहुलने दिलेला सल्ला ठरला महत्वाचा

सुपर ओव्हर जिंकण्यामागचं रहस्य! विराटला केएल राहुलने दिलेला सल्ला ठरला महत्वाचा

भारताने न्यूझीलंडविरुद्ध सलग दुसऱ्या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला. दोन्हीवेळा न्यूझीलंडला संधी असूनही सामने जिंकता आले नाहीत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वेलिंग्टन, 31 जानेवारी : भारताने न्यूझीलंडविरुद्ध सलग दुसऱ्या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला. चौथ्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने सांगितलं की, दोन्ही सामन्यात सुपर ओव्हरमध्ये पोहचल्यानं शेवटपर्यंत शांत राहणं आणि संधी मिळताच पुनरागमन करण्याची शिकवण मिळाली. न्यूझीलंडला सलग दुसऱ्यांदा सामना हातात असतानाही विजय मिळवता आला नाही. तर भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 4-0 ने आघाडी मिळवली आहे. विराट म्हणाला की,‘दोन्ही सामन्यातून खूप काही शिकलो. जेव्हा विरोधी संघ चांगली कामगिरी करत असतो तेव्हा शेवटपर्यंत प्रयत्न करणे आणि महत्वाचं म्हणजे शांत राहणे. सुपर ओव्हरमधील विजयामुळे भारतीय संघाची ताकद समजली.’ न्यूझीलंडला शेवटच्या दोन षटकांत 11 धावांची गरज होती आणि त्यावेळी 7 विकेट त्यांच्याकडे होत्या. मात्र तरीही त्यांना सामना जिंकता आला नाही. सुपर ओव्हरमध्ये पुन्हा एकदा भारताने बाजी मारली. तिसऱ्या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये दोन षटकार मारून सामना जिंकून देणारा रोहित शर्मा चौथ्या सामन्यात नव्हता. त्यामुळे यावेळी कोण खेळणार असा प्रश्न होता. विराट कोहली याबद्दल सांगताना म्हणाला की, सामन्यात संजु सॅमसनने फारशी चमक दाखवली नसली तरी सुपर ओव्हरमध्ये केएल राहुलसोबत त्याला पाठवण्याचा विचार आला होता. तेव्हा केएल राहुलने मी फलंदाजी केली पाहिजे असं सुचवलं असं विराट म्हणाला. सुपर ओव्हर पुन्हा ठरली किवींसाठी किलर! एका क्लिकवर पाहा 11 चेंडूंचा थरार न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन दुखापतीमुळे चौथ्या सामन्यातून बाहेर होता. त्याच्याजागी टीम साउथीने नेतृत्व केलं. तो म्हणाला की, आम्ही ज्या चुका केल्या त्यामुळे भारताला संधी मिळाली. या संधीचा भारताने पूर्ण फायदा उचलला. सुपर ओव्हर म्हणजे डोक्याला ताप, ICC ने VIDEO शेअर करत घेतली फिरकी

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या