ऑकलंड, 02 जानेवारी : न्यूझींलडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत भारताने 5-0 असे निर्विवाद वर्चस्व गाजवलं. अखेरच्या सामन्यात भारताने विराट कोहलीला विश्रांती दिली होती. त्यानंतर फलंदाजी करताना रोहित शर्माला दुखापतीमुळे क्षेत्ररक्षणासाठी उतरता आले नाही. गेल्या दोन सामन्यात सुपर ओव्हरपर्यंत रंगलेला हा सामनाही शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला. पाचवा सामना अनेक नाट्यमय घडामोडींनी भरलेला दिसला. केएल राहुलने ब्रूसला ज्या पद्धतीने धावबाद केलं त्यामुळे धोनीची आठवण झाली. दरम्यान, आठव्या षटकात संजू सॅमसनने सीमारेषेवर दाखवलेल्या चपळाईचे आणि चतुराईचे कौतुक केलं जात आहे. शार्दुल ठाकुरच्या चेंडूवर रॉस टेलरने एक उंच फटका मारला. तेव्हा सीमारेषेवर असलेल्या संजू सॅमसन धावत गेला. मात्र चेंडू सीमारेषेच्या पलिकडे पडणार हे लक्षात येताच सॅमसनने उंच उडी मारुन चेंडू झेलला आणि हवेत असतानाच तो पुन्हा मैदानात टाकला. यामुळे त्यानं चार धावा वाचवल्या.
न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या टी20 सामन्यात भारताने 7 धावांनी विजय मिळवला. भारताने दिलेल्या 164 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची अवस्था एकवेळ 3 बाद 17 अशी झाली होती. त्यानंतर रॉस टेलर आणि टिम सेफर्टने सावध खेळ करत डाव सावरला. 9 षटकांत न्यूझीलंडच्या 64 धावा झाल्या होत्या. त्यानतंर दहाव्या षटकात सेफर्ट आणि टेलरने शिवम दुबेच्या एका षटकात 34 धावा वसूल केल्या. त्यानंतर भारताच्या गोलंदाजांनी सामन्यावर पकड मिळवली. टिम सेफर्टला नवदीप सैनीने बाद केल्यानंतर न्यूझीलंडचे खेळाडू एका पाठोपाठ एक बाद होत गेले. सैनी, वॉशिंग्टन सुंदर आणि बुमराह यांच्या भेदक माऱ्यासमोर न्यूझींलडचे तळाचे फलंदाज टिकाव धरू शकले नाहीत आणि त्यांचा डाव 156 धावांत संपुष्टात आला. तत्पूर्वी, सलामीला खेळणाऱ्या रोहित शर्माने या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली. त्याने संजू सॅमसनला सलामीला खेळवलं. मात्र तो फक्त दोन धावांवर बाद झाला. त्यानंतर रोहित शर्माने अर्धशतकी खेळी केली. लोकेश राहुलसोबत त्याने डाव सावरला. लोकेश राहुल 45 धावांवर बाद झाला. त्यानंतर रोहित शर्माने अर्धशतक साजरं केलं. पण 60 धावांवर त्याला रिटायर्ड हर्ट व्हावं लागलं. त्यानंतर श्रेयस अय्यरने अखेरच्या षटकात फटकेबाजी केल्यानं संघाच्या 20 षटकांत 3 बाद 163 धावा झाल्या. श्रेयस अय्यर 33 धावांवर तर मनिष पांडे 11 धावांवर नाबाद राहिले. ‘विराटने पंतसोबत तसं करू नये’, सेहवागचा धोनीवर गंभीर आरोप रोहित शर्माने अर्धशतक साजरं करताना विराटला मागे टाकलं आहे. रोहितचं टी20 मधील हे 25 वे अर्धशतक असून विराट कोहली 24 अर्धशतकांसह दुसऱ्या स्थानावर आहे. यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या गुप्टिलने 17 अर्धशतके केली आहे. 6 6 4 1 4 6 6 , टेलर आणि सेफर्टने केली दुबेची धुलाई