भर मैदानातून एका प्रेक्षकाने अश्विनला एका वेगळ्याच नावाने हाक मारली. प्रेक्षकाने मारलेली ही हाक अश्विनला खटकली आणि त्याने थेट ट्विट करत याकडे लक्ष वेधले.
मुंबई, 11 फेब्रुवारी : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या कसोटी मालिकेत पहिल्या सामन्यातील तिसरा दिवस आज पारपडला. तिसऱ्याच दिवशी भारताने 132 धावांनी कसोटीतील पहिला सामना जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेतली. तिसऱ्या दिवशी भारताचा अनुभवी गोलंदाज रविचंद्रन अश्विन याने 5 विकेट्स घेऊन ऑस्ट्रेलियाच्या निम्म्या संघाला तंबूत धाडले. भारताच्या रोमहर्षक विजयात अश्विनच्या भेदक गोलंदाजीचा मोठा वाटा होता. परंतु याचवेळी भर मैदानात एका प्रेक्षकाने अश्विनला एका वेगळ्याच नावाने हाक मारली. प्रेक्षकाने मारलेली ही हाक अश्विनला खटकली आणि त्याने थेट ट्विट करत याकडे लक्ष वेधले.
रविचंद्रन अश्विन याला सामन्यादरम्यान एका चाहत्याने ‘अन्ना भैया’ अशी हाक मारली. यावर ट्विट करत अश्विनने लिहिले, “आज स्टेडियमवर कोणीतरी मला अण्णा भैया म्हटलं. अण्णा आणि भैया याचा अर्थ एकाच मोठा भाऊ असा होतो. मला मिळालेल्या प्रेमाबद्दल मी अत्यंत आभारी आहे पण ही एक छोटीशी दुरुस्ती मदत करेल.”
अश्विनचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावर चाहते विविध प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत.