JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / अखेरच्या दोन कसोटीसाठी संघ तोच, पण केएल राहुलबाबत BCCIने घेतला मोठा निर्णय

अखेरच्या दोन कसोटीसाठी संघ तोच, पण केएल राहुलबाबत BCCIने घेतला मोठा निर्णय

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अखेरच्या दोन कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून त्यात आधीच्या दोन कसोटीत असलेल्या खेळाडुंचीच नावे आहेत.

जाहिरात

kl rahul

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दिल्ली, 19 फेब्रुवारी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. भारताने संघात काहीच बदल केलेला नाही. फक्त रिलीज केलेल्या जयदेव उनादकटचे पुनरागमन झाले. तो दुसऱ्या कसोटी सामन्याआधी रणजी ट्रॉफी फायनल खेळण्यासाठी गेला होता. त्याच्या नेतृत्वाखाली सौराष्ट्रने दुसऱ्यांदा रणजी ट्रॉफी जिंकली. आता तो पुन्हा भारताच्या कसोटी संघात दाखल झाला. बीसीसीआय़ने अखेरच्या दोन कसोटी सामन्यासाठी जाहीर केलेल्या संघामध्ये आधीचेच खेळाडू आहेत. मात्र यात एक मोठा बदल झालाय तो म्हणजे केएल राहुलबाबत. आधीच्या दोन सामन्यांसाठी संघ जाहीर केला तेव्हा बीसीसीआय़ने केएल राहुलला उपकर्णधार असल्याचा उल्लेख केला होता. पण यावेळी त्याच्याच नव्हे तर कोणत्याही खेळाडुच्या नावासमोर उपकर्णधार असं लिहिलेलं नाही. हेही वाचा :  विराट 106 तर रोहित 47 कसोटी खेळला, पण पहिल्यांदाच असं घडलं केएल राहुलला गेल्या काही सामन्यात फलंदाजीत चांगली कामगिरी करता आलेली नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतही गेल्या तीन डावात त्याच्याकडून धावा झालेल्या नाहीत. त्यामुळे आता त्याच्याकडून उपकर्णधारपद काढून घेतले असून पुढच्या सामन्यात तो प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर जाण्याची शक्यता आहे.

शुभमन गिल फॉर्ममध्ये असून इंदौर कसोटीत त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते. तिसरा कसोटी सामना इंदौरमध्ये १ ते ५ मार्च या कालावधीत होणार आहे. तर अखेरचा सामना ९ ते १४ मार्चला होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या