मुंबई, 27 जून : सर्व क्रिकेट फॅन्सचं लक्ष लागलेल्या आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2023 चं वेळापत्रक जाहीर झालं आहे. 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर या कालावधीमध्ये हा वर्ल्ड कप होतोय. हा संपूर्ण क्रिकेट वर्ल्ड कप हा भारतामध्येच होणार आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबईमध्ये टीम इंडियाची कोणती मॅच होणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. आयसीसीनं वेळापत्रक जाहीर करताच भारतीय फॅन्सची निराशा झालीय. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारताची पात्रता फेरीतून क्वालिफाय झालेल्या टीमशी 2 नोव्हेंबर रोजी लढत होणार आहे.
मुंबई आणि भारतीय क्रिकेट याचं घट्ट नातं आहे. टीम इंडियाच्या प्रत्येक पिढीतील एक सुपरस्टार खेळाडू हा मुंबईकर आहे. टीम इंडियाचा सध्याचा कॅप्टन रोहित शर्मा देखील मुंबईकर आहे. यापूर्वी भारतामध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्येही मुंबईत टीम इंडियाचे महत्त्वाचे सामने झाले आहेत. 1987 साली झालेल्या वर्ल्ड कपमध्ये भारत विरुद्ध इंग्लंड यांची सेमी फायनल तसंच 1996 साली झालेल्या वर्ल्ड कपमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांचा सामना वानखेडेवर झाला होता. 2011 साली भारत विरुद्ध श्रीलंका ही वर्ल्ड कपची फायनलही वानखेडेवर झाली होती. याच मैदानात महेंद्रसिंह धोनीनं सिक्सर लगावात टीम इंडियाला 28 वर्षांनी वर्ल्ड कप जिंकून दिला होता. भारतीय क्रिकेटच्या अनेक आठवणी असलेल्या वानखेडेवर टीम इंडियाची कमी महत्त्वाची मॅच या वर्ल्ड कपमध्ये होत आहे. त्यामुळे मुंबईकरांमध्ये निराशा व्यक्त होतीय. ICC World Cup : श्वास रोखून धरणारा थरारक सामना पुण्यात, रोहित सेना ‘या’ टीमशी भिडणार मुंबईतील सामने इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका – 21 ऑक्टोबर दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश – 24 ऑक्टोबर भारत विरुद्ध क्वालिफायर 2 – 2 नोव्हेंबर ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान – 7 नोव्हेंबर पहिली सेमी फायनल – 15 नोव्हेंबर भारताचे वर्ल्ड कपमधील सामने 8 ऑक्टोबर - विरुद्ध ऑस्ट्रेलिया, चेन्नई 11 ऑक्टोबर - विरुद्ध अफगाणिस्तान, दिल्ली 15 ऑक्टोबर - विरुद्ध पाकिस्तान, अहमदाबाद 19 ऑक्टोबर - विरुद्ध बांगलादेश, पुणे 22 ऑक्टोबर - विरुद्ध न्यूझीलंड, धर्मशाळा 29 ऑक्टोबर - विरुद्ध इंग्लंड, लखनऊ 2 नोव्हेंबर - विरुद्ध क्वालिफायर 2, मुंबई 5 नोव्हेंबर - विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कोलकाता 1 नोव्हेंबर - विरुद्ध क्वालिफायर 1, बंगळुरू