JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Women T20 World Cup : आज भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला! कधी, कुठे पाहाल सामना?

Women T20 World Cup : आज भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला! कधी, कुठे पाहाल सामना?

आज भारताचा पहिला सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान संघाशी होणार आहे. क्रिकेटच्या मैदानावर होणाऱ्या या महामुकाबल्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष असून पाकिस्तानला पुन्हा एकदा नमवण्याचा मौका भारताकडे असणार आहे.

जाहिरात

आज महिला टी 20 वर्ल्ड मध्ये भारताचा पहिला सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान संघाशी होणार आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 फेब्रुवारी : 10 फेब्रुवारी पासून आयसीसी महिला टी 20 वर्ल्ड कपला सुरुवात झाली आहे. यंदा दक्षिण आफ्रिकेत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून आज भारताचा पहिला सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान संघाशी होणार आहे. क्रिकेटच्या मैदानावर होणाऱ्या या महामुकाबल्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष असून पाकिस्तानला पुन्हा एकदा नमवण्याचा मौका भारताकडे असणार आहे. 10 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी या दरम्यान महिला टी 20 वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. यंदा वर्ल्ड कप स्पर्धेत 10 संघांचा सहभाग असून यांचे दोन ग्रुपमध्ये विभाजन करण्यात आले आहे. यातील ग्रुप B मध्ये इंग्लंड, आयर्लंड, वेस्टइंडीज सह भारत आणि पाकिस्तान या संघांचाही समावेश आहे. अशातच आज भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमधील आपला पहिला सामना खेळणार आहेत. स्पर्धेची सुरुवात विजयाने करण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल तेव्हा दोन्ही संघातील ही लढत अधिक चुरशीची होणार आहे. हे ही वाचा  : नागपूर कसोटीचा हिरो ठरलेल्या रवींद्र जडेजाला आयसीसीने ठोठावला दंड कधी होणार सामना : आज १२ फेब्रुवारी रोजी भारत पाकिस्तान महिला क्रिकेट संघांमध्ये ग्रुप स्टेज सामना रंगणार आहे. हा सामना दक्षिण आफ्रिकेतील न्यूलँड्स क्रिकेट ग्राऊंड मध्ये होणार आहे. सायंकाळी साडे सहा वाजता या सामन्याला सुरुवात होणार असून यापूर्वी अर्धातास आधी नाणेफेक होईल.

कुठे होणार सामना : भारतात महिला टी 20 वर्ल्डकप 2023 चे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाणार आहे. याचबरोबर हा सामना डिझनी+हॉटस्टारवर देखील लाईव्ह पाहता येतील. भारताचा टी 20 महिला संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शफाली वर्मा, यस्तिका भाटिया, ऋचा घोष, जेमिमाह रॉड्रिग्ज, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, राधा यादव, रेणुका ठाकूर, अंजली सरवाणी, पूजा वस्त्राकर, राजेश्वरी गायकवाड, राजेश्‍वरी गायकवाड.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या