वाराणसी, 17 जून : ICC Cricket World Cupमध्ये भारतीय संघानं पाकिस्तानला 89 धावांनी पराभूत केले. वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत एकदाही पाकिस्तानला भारतावर विजय मिळवता आलेला नाही. तब्बल 7 वेळा भारतीय संघानं पाकिस्तानला नमवले आहे. या हायवोल्टेज सामन्यांत सट्टेबाजारातही मोठी उलथापालथ झाली. या सामन्यावर तब्बल 800 कोटींचा सट्टा लावण्यात आला होता. मध्यप्रदेशमधील सटोरिए येथे या सामन्यावर कोटींचा सट्टा लावण्यात आला होता. याप्रकरणी एकाला अटकही करण्यात आली आहे. पोलिसांनी छापे टाकत 2 लाख रुपये रोकड, पाच मोबाईल, टीव्ही, सेटटॉप बॉक्स जप्त केला आहे. मध्यप्रदेशमध्ये फक्त 800 कोटींचा सट्टा लावण्यात आला होता. . सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पावसामुळं या सट्ट्यावर काहीही परिणाम झाला नाही. भारतावर 1.85 पैसे भाव लावण्यात आला आहे. तर, पाकिस्तानवर 2.16 रुपये भाव लावण्यात आला आहे. क्रिकेट सामना सुरु असताना भोपाळ पोलिसांनी दुबईमध्ये बसून सट्टा लावणाऱ्या एकाला अटक केली आहे. या आरोपीला मुंबई विमानतळावरून अटक केली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 110 लोकांनी सट्टा लावला होता. या सामन्यावर सट्टा लावणारे साधारणत: 16 ते 35 वयोगटातले लोक होते. ICC Cricket World Cup 2019मध्ये भारतीय संघ सध्या चांगल्याच जोमात आहे. आपला कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला तब्बल 89 धावांनी नमवत विराट सेनेने आपली विजयी परंपरा कायम राखली. वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत 7 वेळा भारतीय संघाने पाकिस्तानला पाणी पाजले आहे. भारतीय संघाने दिलेल्या 337 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना, पाकिस्तानच्या फलंदाजांची दमछाक उडाली. पावसामुळे हा खेळ केवळ 40 षटकांचा झाला. यातही भारतीय संघाने पाकिस्तानवर तब्बल 89 धावांनी विजय मिळवला. यामुळे गुणतालिकेत भारतीय संघ सध्या 7 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. या सामन्यात पाकिस्तानानं नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र, हा निर्णय त्यांना महागात पडला. वाचा- इंग्लंडचा खेळाडू विराटला म्हणाला, ‘तुझ्यामुळे डिलीट करावं लागेल ट्विटर अकाउंट’ वाचा- विराट कोहलीची चिंता वाढली, धवननंतर आता आणखी एक खेळाडू जखमी वाचा- World Cup : INDvsPAK : सामना संपण्याआधीच आफ्रिदीने भारताचं केलं अभिनंदन! रोहित शर्मा ठरला भारताच्या विजयाचा शिल्पकार, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या