मँचेस्टर, 07 जुलै : ICC Cricket World Cup मध्ये अंतिम टप्प्यात ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाला साखळी फेरीत शेवटचा सामना गमवावा लागला. या सामन्यावेळी त्यांना डबल दणका बसला. दोन खेळाडू जखमी झाले आहेत. यात उस्मान ख्वाजा आणि अष्टपैलू मार्कस स्टोइनिस यांचा समावेश आहे. दोन्ही खेळाडू सेमीफायनलमध्ये खेळण्याची शक्यता कमी आहे. या खेळाडूंच्या जागी राखीव खेळाडू म्हणून यष्टीरक्षक मॅथ्यू वेड आणि अष्टपैलू खेळाडू मिशेल स्टार्कला संघात घेतलं आहे. ऑस्ट्रेलिया संघात समावेश नसला तरी मॅथ्यू वेड तुफान फॉर्ममध्ये आहे. त्यानं इंग्लंड दौऱ्यावर डर्बीशरविरुद्ध 45 चेंडूत शतक केलं होतं. कोणत्याही ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूनं केलेलं हे सर्वात वेगवान शतक होतं. वेडने या सामन्यात 71 चेंडूत 155 धावा केल्या होत्या. याशिवाय नॉर्थम्प्टशायरविरुद्ध 67 चेंडूत 117 धावा केल्या होत्या. तर शेफील्ड शील्डमध्ये खेळताना 60 च्या सरासरीने 1 हजार 21 धावा केल्या. वेडला उस्मान ख्वाजाच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर संधी दिली जाण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड कप जिंकून देणारा माजी कर्णधार मायकल क्लार्कने वेडला संघात घेतल्याच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. त्याच्या मते वेड जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. तर ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू डीन जोन्सने वेडला प्लेइंग इलेव्हनमध्ये घेण्याची मागणी केली आहे. साखळी फेरीत आफ्रिकेनं पराभव केल्यानं ऑस्ट्रेलियाला गुणतक्त्यात दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं आहे. त्यामुळं ऑस्ट्रेलियाचा सेमीफायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध सामना होईल. 11 वर्षांनी पुन्हा विराटच्या वाटेत विल्यम्सनचा अडथळा, कोण मारणार बाजी? VIDEO: भाजपात प्रवेश करण्यासाठी विचार करण्याची गरज नाही- सपना चौधरी