JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / VIDEO: टीम इंडियाच्या खेळाडूची इंग्लंडमध्ये झेप, जबरदस्त कॅच पाहून इंग्रजांना बसला धक्का

VIDEO: टीम इंडियाच्या खेळाडूची इंग्लंडमध्ये झेप, जबरदस्त कॅच पाहून इंग्रजांना बसला धक्का

भारतीय खेळाडू सध्या आयपीएलमध्ये (IPL 2021) व्यस्त आहेत. त्याचवेळी टीम इंडियाच्या (Team India) टेस्ट टीमचा सदस्य हनुमा विहारी (Hanmua Vihari) इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेट खेळत आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लंडन, 16 एप्रिल : भारतीय खेळाडू सध्या आयपीएलमध्ये (IPL 2021) व्यस्त आहेत. त्याचवेळी टीम इंडियाच्या (Team India) टेस्ट टीमचा सदस्य हनुमा विहारी (Hanmua Vihari) इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेट खेळत आहे. इंग्लंडमध्ये 18 ते 22 जून या कालावधीत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल होणार आहे. या फायनलपूर्वी विहारीला तेथील वातावरणाचा सराव होण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. मिडल ऑर्डरचा बॅट्समन आणि स्पिनर असलेला विहारी सध्या इंग्लंडच्या क्रिकेट विश्वात चर्चेचा विषय बनलाय. त्यानं एक जबरदस्त कॅच घेतला असून त्यामुळे त्याच्या टीममधील सर्व इंग्रज आश्चर्यचकित झाले आहेत. या अविश्वसनीय फिल्डिंगवर त्यांचा विश्वास बसयाला वेळ लागला. हनुमा विहारी 15 एप्रिलपासून सुरु झालेल्या कौंटी मॅचमध्ये खेळत आहे. त्यानं वार्विकशायर या कौंटी टीमकडून पदार्पण केलं आहे. नॉटिंगहमशायर विरुद्धच्या या मॅचमध्ये विहारीच्या टीमची पहिल्यांदा फिल्डिंग होती. त्यावेळी विहारीनं हवेत उडी मारत फक्त एका हातानं अफलातून कॅच पकडला. आयपीएल लिलावामध्ये हनुमा विहारीला कोणत्याच टीमने विकत घेतलं नाही, यानंतर इंग्लंडमधली काऊंटी टीम वार्विकशायर त्याच्यासोबत करार केला. बर्मिंघमच्या या काऊंटी क्लबकडून विहारी कमीत कमी तीन मॅच खेळेल.

संबंधित बातम्या

2019 साली हनुमा विहारी दिल्ली कॅपिटल्ससोबत होता, पण टेस्ट स्पेशलिस्टचा शिक्का लागल्यामुळे विहारीला नंतर आयपीएलमध्ये संधी मिळाली नाही. 27 वर्षांच्या हनुमा विहारीने भारताकडून 12 टेस्टमध्ये 32 पेक्षा जास्तच्या सरासरीने 624 रन केले आहेत, यामध्ये एक शतक आणि चार अर्धशतकांचा समावेश आहे. IPL 2021: उडता संजू! शिखर धवनचा घेतला अफलातून कॅच, सहकारी झाले स्तब्ध सिडनी टेस्टमध्ये स्नायू दुखावल्यानंतरही हनुमा विहारीनं 4 तास बॅटिंग करून नाबाद 23 रन केले. विहारीनं अश्विनच्या मदतीने सिडनी टेस्ट ड्रॉ केली, यानंतर भारताने सीरिजमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. दुखापतीमुळे विहारी एनसीएमध्ये उपचार घेत होता, यानंतर त्याने विजय हजारे ट्रॉफीमधून पुनरागमन केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या