IND vs AUS : इंदोरमध्ये 'हमारी भाभी कैसी हो' च्या घोषणा ऐकून लाजला शुभमन, पाहा व्हिडिओ
मुंबई, 2 मार्च : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात इंदोर येथे कसोटी मालिकेतील दुसरा सामना सुरु आहे. होळकर स्टेडियम येथे हा सामना खेळवला जात असून आज सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलिया संघाने 88 धावांची आघाडी घेतली. तर भारतीय संघ दुसऱ्या डावात फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर गटांगळ्या खाताना दिसला. याच दरम्यान तिसऱ्या सामन्यात भारताच्या प्लेयिंग 11 मध्ये स्थान मिळवलेल्या शुभमन गिलला ग्राउंडवर पाहून चाहत्यांनी पुन्हा त्याला सारा वरून चिडवलं. भारताचा युवा स्टार खेळाडू शुभमन त्याच्या खेळाप्रमाणेच त्याच्या वैयक्तिक आयुष्यावरून देखील खूप चर्चेत राहतो. शुभमन गिल याचे नाव कधी सारा तेंडुलकर तर कधी अभिनेत्री सारा अली खान हिच्या सोबत जोडले जाते. परंतु अद्याप शुभमन जिला डेट करतो ती सारा नेमकी कोण यावर अद्याप त्याने स्पष्ट केलेले नाही. तेव्हा चाहते त्याला अनेकदा ‘सारा’ नावाने चिडवताना दिसतात.
काही दिवसांपूर्वी न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या वनडे आणि टी 20 मालिकेत देखील शुभमन गिलला पाहून स्टेडियमवर सामना पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांनी “हमारी भाभी कैसी हो, सारा भाभी जैसी हो” अशा घोषणा दिल्या. तर आज इंदोर येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान फिल्डिंग करत असताना शुभमनला पासून चाहत्यांनी “हमारी भाभी कैसी हो, सारा भाभी जैसी हो” च्या घोषणा दिल्या. हे पाहून शुभमन गिल गालातल्या गालात लाजला.
वाईट फॉर्मातून जात असलेल्या के एल राहुल याला बेंचवर बसवून शुभमन गिल याला प्लेयिंग ११ मध्ये स्थान देण्यात आले आहे. परंतु फलंदाजीच्या दोन्ही डावात शुभमन गिल भारतासाठी काही खास कामगिरी करू शकला नाही. आज दुसऱ्या डावात फलंदाजी करताना शुभमन अवघ्या ५ धावा करून बाद झाला.