सिडनी, 13 नोव्हेंबर : क्रिकेटमध्ये एखाद्या फलंदाजासाठी जेवढे शतक महत्त्वाचे असते, तेवढीच गोलंदाजासाठी हॅट्रिक. गोलंदाजाच्या करिअरमध्ये हॅट्रिक किंवा पाच विकेट घेणे याचे महत्त हे अनन्य साधारण असते. हा अनुभव फक्त गोलंदाजाला चांगल्या संधी मिळवून देतो, त्याचबरोबर प्रेक्षकांसाठी हा रोमांचक अनुभव असतो. असाच प्रसंग क्रिकेटच्या इतिहासात गेल्या 4 दिवसाच घडला आहे. गेल्या 4 दिवसांत चाहत्यांना एक, दोन नाही तर तब्बल 4 हॅट्रिकचा अनुभव घेता आला. क्रिकेटमध्ये इतिहासात कदाचित पहिल्यांदा असा प्रकार घडला असावा. जेव्हा 4 दिवसात 3 गोलंदाजांना हॅट्रिक घेण्याची कामगिरी केली आहे. यात एका अभिमानाची गोष्ट म्हणजे यातला एक गोलंदाज भारतीय आहे. भारताचा युवा गोलंदाज दीपक चाहरनं गेल्या 72 तासांच्या आत दोन वेळा हॅट्रिक घेण्याची कामगिरी केली आहे. दीपक चाहरनं सुरू केला हॅट्रिकचा वर्षाव सगळ्यात आधी भारत-बांगलादेश यांच्यात झालेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात दीपक चाहरनं हॅट्रिक घेण्याची कामगिरी केली. नागपूरमधील सामन्यात हॅट्रिकसह 6 गडी बाद करून इतिहास रचला. त्याने 3.2 षटकांत 7 धावा देत 6 गडी बाद केले. बांगलादेशच्या डावाच्या शेवटच्या षटकात त्यानं हॅट्रिक पूर्ण केली. त्याने तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर एक गडी बाद केला होता. त्यानंतर अखेरच्या षटकात पहिल्या दोन चेंडूवर 2 गडी बाद करून बांगलादेशचा डाव संपुष्टात आणला. त्याच्यानंतर लगेचच सैयद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीमध्ये राजस्थानकडून खेळताना दीपक चाहरनं ही अशी कामगिरी केली. वाचा- ‘किती बेशरम आहेस यार तू’, दीपक चाहरनं रेकॉर्ड मोडल्यावर भडकला चहल!
शेफिल्ड शील्डमध्ये झाली तिसऱ्या हॅट्रिकची नोंद ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या शेफील्ड शील्ड स्पर्धेत मिचेल स्वेपसन (Mitchell Swepson) या गोलंदाजानं विक्टोरिया संघाविरोधात हॅट्रिक घेण्याची कामगिरी केली. क्विन्सलॅंड संघाच्या या फिरकी गोलंदाजांना प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना फलंदाजी करूच दिली नाही. या गोलंदाजानं 110व्या ओव्हरमध्ये ही कमगिरी केली. स्वेपसननं हॅट्रिक कामगिरी करत एकूण 4 विकेट घेतल्या. तसेच, प्रतिस्पर्धील संघाला केवळ 300 धावांवर रोखले. स्वेपसन हा चार दिवसांत हॅट्रिक घेणारा तिसरा गोलंदाज आहे. वाचा- ऐतिहासिक कसोटी सामन्याआधी भारताला मिळाला ‘महागुरू’, रहाणेनं सांगितला मास्टरप्लॅन
मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये घेतली गेली चौथी हॅट्रिक बांगलादेश विरोधात झालेल्या सामन्यात दीपक चाहरनं राजस्थानकडून खेळताना हॅट्रिक घेण्याची कामगिरी केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी उत्तराखंडचा गोलंदाज मयंक मिश्रा यानं हॅट्रिक घेण्याची कामगिरी केली आहे. वाचा- असा गोलंदाज होणे नाही! 72 तासांत भारतीय गोलंदाजानं घेतली दुसरी हॅट्रिक
त्यामुळं क्रिकेटच्या इतिहासात सलग चार दिवसांत चार हॅट्रिकची नोंद झाली आहे.