मुंबई, 23 मे : टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) याने काही दिवसांपूर्वी भारताची माजी क्रिकेटपटू केएस श्रवंती नायडूच्या (KS Sravanthi Naidu) आईच्या उपचारासाठी मदत केली होती. विराटच्या या मदतीनंतर श्रवंतीच्या जीव वाचला नाही. श्रवंतीच्या आई एसके सुमन यांचे शनिवारी निधन झाले. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामध्ये त्यांची प्रकृती खालावली होती. श्रवंतीच्या घरच्यांनी केलेल्या विनंतीनंतर त्यांना घरी पाठवण्यात आले होते. राहत्या घरीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विराटने केली होती मदत श्रवंतीच्या आईला कोरोना झाल्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना रुग्णालयात ठेवलं असलं तरी उपचारासाठी त्यांच्याकडे जास्त पैसे नव्हते, त्यामुळे विराटने श्रवंतीला 6.77 लाख रुपये दिले. श्रवंतीने बीसीसीआय (BCCI) आणि हैदराबाद क्रिकेट असोसिएशनलाही मदतीचं आवाहन केलं होतं. त्यानंतर हैदराबाद क्रिकेट असोसिएसशनंही तिला आर्थिक मदत केली होती. विराट कोहलीला श्रवंतीच्या आर्थिक अडचणींबाबत कळालं. बीसीसीआय साऊथ झोनच्या माजी संयोजक एन.विद्या यादव यांनी ट्वीट करून श्रवंतीच्या आईला मदत करा, असं आवाहन केलं. यामध्ये त्यांनी विराटलाही टॅग केलं. विराटनेही लगेच या ट्वीटवर रिप्लाय दिला. टीम इंडियाचे फिल्डिंग कोच आर.श्रीधर (R Sridhar) यांनीही श्रवंतीच्या आईसाठी पैसे जमा केले, त्यांनीही विराटला याबाबत सांगितलं. दुर्दैवाने विराट आणि अन्य सर्वांनी केलेली ही धावपळ श्रवंतीच्या आईंचा जीव वाचवू शकली नाही.
IPL 2021 : आयपीएल स्थगित झाली नसती तरी सोडून गेलो असतो, चहलने सांगितलं कारण गेल्या काही दिवसात तिसऱ्या महिला क्रिकेटपटूच्या आईचे कोरोनामुळे निधन झाले आहे. यापूर्वी वेदा कृष्णमूर्तीच्या आईचं कोरोनामुळे निधन झाले. त्यानंतर काही दिवसांपूर्वी प्रिया पूनिया यांच्या आईचे देखील निधन झाले होते.