FIFA WC 2018 : थरारक सामन्यात पेनल्टी शूटआऊटमध्ये रशियाची स्पेनवर ४-३ने मात

फिफा विश्वचषक स्पर्धेत यजमान रशियाने 2010मधील विश्वविजेता संघ स्पेनला पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-3ने हरवून नॉकआऊट फेरीतील सामना जिंकून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केलाय.

Sonali Deshpande
रशिया, 02 जुलै : फिफा विश्वचषक स्पर्धेत यजमान रशियाने 2010मधील विश्वविजेता संघ स्पेनला पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-3 ने हरवून नॉकआऊट फेरीतील सामना जिंकून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केलाय. दोन्ही संघांदरम्यान लुजिन्हकी स्टेडिअममध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात काँटे की टक्कर पहायला मिळाली. पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांनी गोल करुन 1-1 ने बरोबरी राखली होती.याआधी इतिहासात १९७० साली सोव्हिएत रशियाने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती.  पण पुढच्या 48 वर्षात रशियाला फारसं यश मिळालं नव्हतं. कालच्या सामन्यात रशियाने घरच्या मैदानावर खेळत असताना धडाकेबाज कामगिरी करत ४८ वर्षांचा दुष्काळ संपवला आहे. २०१८ सालच्या फिफा विश्वचषकाचा मान रशियाला मिळाल्यानंतर राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी यशस्वीपणे विश्वचषकाचं आयोजन करून दाखवलं.

Trending Now