JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Ben Stokes Retirement : शेवटच्या वनडेमध्ये बेन स्टोक्सला अश्रू अनावर, मैदानातला इमोशनल Video

Ben Stokes Retirement : शेवटच्या वनडेमध्ये बेन स्टोक्सला अश्रू अनावर, मैदानातला इमोशनल Video

इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका (England vs South Africa) यांच्यातल्या तीन वनडे मॅचच्या सीरिजची पहिली मॅच चेस्टर ली स्ट्रीटमध्ये खेळवली जात आहे. हा सामना इंग्लंडचा ऑलराऊंडर बेन स्टोक्ससाठी (Ben Stokes) खास आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 19 जुलै : इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका (England vs South Africa) यांच्यातल्या तीन वनडे मॅचच्या सीरिजची पहिली मॅच चेस्टर ली स्ट्रीटमध्ये खेळवली जात आहे. हा सामना इंग्लंडचा ऑलराऊंडर बेन स्टोक्ससाठी (Ben Stokes) खास आहे, कारण स्टोक्सची ही शेवटची वनडे मॅच आहे. सोमवारीच स्टोक्सने वनडे क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली होती. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. इंग्लंडची टीम जेव्हा मैदानात फिल्डिंगसाठी उतरली तेव्हा मैदानातलं वातावरण भावुक झालं होतं. मैदानात उतरताच बेन स्टोक्सच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. इंग्लंड क्रिकेटने याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

संबंधित बातम्या

टेस्ट-टी-20 खेळणार बेन स्टोक्सने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो टेस्ट आणि टी-20 क्रिकेट खेळत राहणार आहे. स्टोक्सला काहीच दिवसांपूर्वी टेस्ट टीमचं कर्णधार करण्यात आलं आहे. टेस्ट टीमचा कर्णधार झाल्यानंतर स्टोक्सच्या नेतृत्वात इंग्लंडने न्यूझीलंडचा 3-0 ने पराभव केला, तर भारताविरुद्धच्या एजबॅस्टन टेस्टमध्ये इंग्लंडचा ऐतिहासिक विजय झाला. इंग्लंडने टेस्ट इतिहासात सगळ्यात मोठ्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला. स्टोक्सचं वनडे करियर स्टोक्सने 20व्या वर्षी 2011 साली आयर्लंडविरुद्धच्या सामन्यातून इंग्लंडकडून पदार्पण केलं. 31 वर्षांच्या स्टोक्सने वनडे करियरमध्ये फक्त 104 सामन्यांमध्ये भाग घेतला. वनडेमध्ये त्याने 40 च्या सरासरीने 2919 रन केले, यात त्याच्या नावावर 3 शतकं आणि 21 अर्धशतकं आहेत. तसंच त्याने 74 विकेटही घेतल्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या