JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / T20 WC: कोच रवि शास्त्रींनी सांगितला प्लॅन; संघ निवडीबाबत म्हणाले...

T20 WC: कोच रवि शास्त्रींनी सांगितला प्लॅन; संघ निवडीबाबत म्हणाले...

टी-20 वर्ल्ड कप (T20 Worldcup) मध्ये टीम इंडियाची पाकिस्तानसोबत (INDvsPAK) होणाऱ्या लढतीपूर्वी कोच रवि शास्त्री (Ravi Shastri) यांनी संघ निवडीबाबत भाष्य करत स्पर्धेचा प्लॅन कसा असणार आहे हे स्पष्ट केले आहे.

जाहिरात

Ravi Shastri

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दुबई, 18 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कप (T20 Worldcup) मध्ये टीम इंडियाची पाकिस्तानसोबत (INDvsPAK) होणाऱ्या लढतीपूर्वी कोच रवि शास्त्री (Ravi Shastri) यांनी संघ निवडीबाबत भाष्य करत स्पर्धेचा प्लॅन कसा असणार आहे हे स्पष्ट केले आहे. रविवार, 24 ऑक्टोबरला भारताची लढत पाकिस्तान संघाशी होणार आहे. भारतीय क्रिकेट संघ टी -२० विश्वचषकातील पहिला सामना २४ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. भारताने मुख्य सामन्यापूर्वी पहिल्या सराव सामन्यात सोमवारी इंग्लंडचा सात गडी राखून पराभव केला. सामन्यादरम्यान, शास्त्री यांनी पाकिस्तानसोबत होणऱ्या लढतीत टीम इंडियाची आखणी कशी असणार आहे, हे स्पष्ट केले आहे. David Warner चा हिटमॅन रोहित शर्मावर चोरीचा आरोप; काय आहे नेमकं प्रकरण? नाणेफेक किंवा संघ निवडीबाबत कोणतीही विशिष्ट रणनीती नाही असे ठाम मत शास्त्री यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच, जो काही निर्णय होईल तो खेळपट्टीच्या परिस्थितीनुसार घेतला जाईल असेही शास्त्री यांनी यावेळी म्हटले आहे. या स्पर्धेबाबत रवी शास्त्री यांनी असेही स्पष्ट केले आहे की, 20 ऑक्टोबर रोजी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या दोन सराव सामन्यांचे प्राथमिक उद्दिष्ट खेळाडूंना फॉर्म आणि लयच्या दृष्टीने कसे ठेवले जाते हे समजून घेणे आहे. माजी यष्टीरक्षक दीप दासगुप्ता यांना स्टार स्पोर्ट्सवरील संभाषणादरम्यान शास्त्री यांनी आगामी सामन्यावर भाष्य केले. “आम्ही किती दव आहे हे पाहण्याचा प्रयत्न करू आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ किंवा त्यानुसार गोलंदाजी करू. यामुळे आम्हाला अतिरिक्त फिरकीपटू किंवा वेगवान गोलंदाज प्लेइंग इलेव्हनमध्ये ठेवायचे की नाही हे ठरवण्यात मदत होईल, असे शास्त्री म्हणाले. T20 Worldcup स्पर्धेत INDvsPAK सामना रद्द करण्याच्या मागणीवर BCCI चे मोठे विधान तसेच, गेल्या दोन महिन्यांपासून खेळाडू आयपीएल खेळत आहेत, त्यामुळे त्यांना जास्त तयारीची गरज आहे असे मला वाटत नाही. त्यांना फक्त वातावरणाशी जुळवून घ्यावे लागणार आहे. त्यांना फक्त लयीत परत यावे लागेल. या खेळामध्ये प्रत्येकजण फलंदाजी करू शकतो आणि प्रत्येकजण गोलंदाजी करू शकतो. त्यामुळे तो कसा खेळ करत आहे याची कल्पना येण्यास आम्हाला मदत होईल,” असे शास्त्री यांनी स्टार स्पोर्ट्सला सांगितले. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून शास्त्री यांची ही प्रशिक्षक म्हणून शेवटची स्पर्धा आहे आणि टी -२० विश्वचषक संपल्यानंतर ते पद सोडतील. त्याच्यांनंतर राहुल द्रविडला संघाचे पुढील मुख्य प्रशिक्षक बनवले जाऊ शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या