JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / संघातून बाहेर असलेल्या रोहित शर्माला चहल म्हणाला,'जळू नकोस'

संघातून बाहेर असलेल्या रोहित शर्माला चहल म्हणाला,'जळू नकोस'

भारताचा गोलंदाज युझवेंद्र चहलने एकदिवसीय संघात पुनरागमन केलं तर रोहित शर्मा दुखापतीने बाहेर पडला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी : टीम इंडियाचे अनेक खेळाडू सोशल मीडियावर एकमेकांची खिल्ली उडवत असतात. यात भारताचा युझवेंद्र चहल, रोहित शर्मा हे आघाडीवर आहेत. युझवेंद्र चहल अनेकदा सामन्याआधी किंवा सामना संपल्यानंतर तसेच सरावावेळी चहल टीव्हीच्या माध्यमातून इतर खेळाडूंशी मजेशीर संवाद साधत असतो. त्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. टी20 मालिका जिंकल्यानंतर केलेल्या डान्सचा व्हिडिओ तुफान गाजला होता. आता त्याचा श्रेयस अय्यरसोबतचा फोटो चर्चेत आला आहे. फोटो चर्चेत येण्याचं कारण त्यावर रोहित शर्माने केलीली कमेंट आणि त्याला चहलने दिलेला रिप्लाय आहे. चहलने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये अय्यरसोबत चहल दिसत आहे. यावर रोहित शर्माने चहलची गंमत करण्यासाठी एक कमेंट केली आहे. त्यावर चहलनेसुद्धा त्याच्या स्टाइलने उत्तर दिलं आहे. चहल म्हणाला की, तु इथं नाहीस म्हणून तुला आमची आठवण येत आहे. पण जळू नकोस लवकरच तुझ्यासोबतचा फोटो टाकेन.

भारताने न्यूझीलंडविरुद्धची 5 सामन्यांची टी20 मालिका 5-0 ने जिंकली. त्यानंतरच्या एकदिवसीय मालिकेत 3-0 ने पराभवाची नामुष्की विराट सेनेवर ओढावली. आता दोन्ही संघ दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत आमने-सामने येणार आहेत. रोहित शर्मा दुखापतीमुळे न्यूझीलंड दौऱ्यातून बाहेर पडला आहे. त्याला कसोटीतही खेळता येणार नाही. टी20 आणि वनडे नंतर आता भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. यातील पहिला सामना 21 फेब्रुवारीला होणार आहे. त्यानंतर दुसरा सामना 29 फेब्रुवारीला ख्राइस्टचर्च इथं होणार आहे. दरम्यान भारतीय संघ तीन दिवसीय सराव सामनाही खेळणार आहे. वाचा : न्यूझीलंडविरुद्ध पराभवानंतर विराट भडकला, टीममधील खेळाडूंना खडसावलं

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या