नवी दिल्ली, 15 मे : कोरोनाव्हायरस (Coronavirus) सारख्या खतरनाक रोगानं साऱ्या जगाला खिळखिळीत केलं आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सध्या लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामुळं जवळजवळ 3 महिने सर्व लोकं घरात कैद आहेत. लॉकडाऊनमुळे मुलंही बाहेर जाऊ शकत नाही आहेत. त्यामुळं सध्या घरातच वाढदिवस किंवा अन्य कार्यक्रम साजरे केले जात आहेत. यात कोरोना वॉरियर्स सध्या लोकांसा सर्वोतपरी मदत करत आहेत. डॉक्टरांबरोबरच पोलीसही या युद्धात आघाडीवर आहे. पोलिसांचे अनेक व्हिडीओ सध्या व्हायरल होत असतात. लॉकडाऊनमध्ये पोलिसांनी अनेकांचा वाढदिवस साजरा केला. अशातच पोलिसांची गाडी थेट सहा वेळा विश्वविजेते बॉक्सर एमसी मेरी कोमच्या घरी पोहचली. ऑलिम्पिक पदकविजेते आणि राज्याचे खासदार एम.सी. मेरी कोमचा सर्वात धाकटा मुलगा प्रिन्ससाठी वाढदिवस पोलिसांनी खास केला. दिल्ली पोलिसांची एक टीम प्रिन्सचा वाढदिवस साजरा करण्यासाठी थेट त्यांच्या घरी पोहचली. गुरुवारी प्रिन्स सात वर्षांचा झाला आणि त्यानं आपला वाढदिवस आपल्या आई-वडिलांसह दोन मोठे जुळे भाऊ आणि लहान बहिणीसह तुघलक रोड पोलीस स्टेशनच्या पोलिसांसह साजरा केला. वाचा- लॉकडाऊनमध्ये मुलाला मागे बसवून तब्बल 500 किलोमीटर महिलेनं चालवली दुचाकी
वाचा- सर्वात मोठं यश! 24 शास्त्रज्ञांनी शोधला कोरोनाला मारण्याचा यशस्वी फॉर्म्युला आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या मेरी कोमनं हा व्हिडीओ ट्वीट केला. यात तिनं पोलिसांचे आभार मानत, “माझ्या मुलाचा वाढदिवस तुमच्यामुळं कास झाला. त्यानिमित्तानं मी दिल्लीच्या डीसीपींचे आभार मानते. तुम्ही खरे योद्धा आहात. तुझ्या वचनबद्धतेला आणि समर्पणाबद्दल मी सलाम करते”, असे लिहिले. वाचा- दिल्लीतील रस्ते पाहून व्हाल हैराण! एका रात्रीत पसरली बर्फाची चादर, पाहा VIDEO